Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra| ‘आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही, म्हणून…’, सवत असूनही कशा आनंदी राहतात हेमा मालिनी?

'प्रेमात सन्मान द्यावा लागतो...', पती असूनही हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याकडून ठेवल्या नाहीत कोणत्या अपेक्षा? आयुष्यभर अभिनेत्रीला करावा लागला अनेक गोष्टींचा सामना...

Dharmendra| 'आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही, म्हणून...', सवत असूनही कशा आनंदी राहतात हेमा मालिनी?
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 10:48 AM

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांनी माहिती आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्षा झाली आहेत. पण आजपर्यंत धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केला नाही. धर्मेंद्र आज त्यांच्या पहिल्या कुटुंबासोबत राहत आहेत. हेमा मालिनी मात्र आजही तडजोड करत आयुष्य जगत आहे. अनेकदा खुद्द हेमा मालिनी यांनी त्यांच्या मनातील खंत स्पष्ट बोलून दाखवली. एवढंच नाही तर, नुकताच अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं. पण देओल कुटुंबाच्या मुलाच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या.. ज्यामुळे तुफान चर्चा रंगल्या…

दरम्यान, एक मुलाखतीत हेमा मालिनी यांनी ‘मला जे हवं होतं, ते सर्व काही मिळालं नाही…’ असं म्हणत खंत व्यक्त केली. मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात? यावर उत्तर देत हेमा मालिनी यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे हेमा मालिनी आयुष्यात तडजोड करत ही गोष्ट तर समोर आलीच..

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी असं म्हणणार नाही की आनंदी आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या. तरुण वयात प्रत्येक जण परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही.. हे कटु सत्य आहे आणि त्याचा काहीही अर्थ नाही…’

हे सुद्धा वाचा

पुढे हेमा मालिनी यांना ‘सवत असल्यामुळे आयुष्यात अडचणी नाही आल्या?’ यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘बिलकूल नाही… याच कारणामुळे मी आज आनंदी आहे. प्रेमात तुम्ही कायम समोरच्याचं मन सांभाळत असता. कोणत्या अपेक्षा नसतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता आणि अखेर त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला फक्त प्रेम मिळतं. अपेक्षा नसतील तर छोट्या – छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात अडचणी येत नाहीत..

‘एक व्यक्ती म्हणून काही गोष्टींचा आजही पश्चाताप होत आहे, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील… ‘ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्न केलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आज हेमा मालिनी त्यांच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.