जेव्हा Hema Malini यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सोडलं मौन; सांगितली मोठी गोष्ट

कसं आहे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचं नातं... लग्नानतंर आजपर्यंत हेमा यांनी ठेवला नाही धर्मेंद्र यांच्या जुन्या घरात पाय...

जेव्हा Hema Malini यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सोडलं मौन; सांगितली मोठी गोष्ट
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 3:22 PM

Hema Malini On Dharmendra First Wife : अभिनेते धर्मेंद्र (dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (hema malini ) यांच्या रिलेशनशिपबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. कशी दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि हेमा यांच्यासोबत संसार थाटण्यासाठी धर्मेंद्र यांनी केलेले प्रयत्न आज अनेक जोडप्यांना कपल गोल्स देत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित असून पिता देखील होते. पण कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता हेमा आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. १९८० साली दोघांनी लग्न केलं आणि सुखी संसाराला सुरुवात केली. एका मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. (Hema Malini and Dharmendra love story)

एका मुलाखतीत हेमा यांना विचारलं की, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून तुम्हाला काही त्रास होतो. यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘बिलकूल नाही… त्यामुळे आज मी प्रचंड आनंदी आहे. धर्मेंद्र यांच्याकडून प्रचंड प्रेम मिळत होतं, ज्यामुळे छोट्या – छोट्या गोष्टीसाठी कोणी त्यांना इतका त्रास का देईल…’ असं हेमा म्हणाल्या.

‘जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला फक्त प्रेम द्यायला हवं. अशा नात्यात तुम्ही कोणतीही गोष्ट मागू शकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता आणि त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला प्रेम मिळतं असेल तर, तुम्ही त्याला छोट्या – छोट्या गोष्टीसाठी त्रास देवू शकत नाही.’ (dharmendra first movie)

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाल्या, ‘दोघांमध्ये असलेलं प्रेम कायम रहावं म्हणून त्यांच्या अडचणी समजून घेवून मी माझं आयुष्य अॅडजस्ट केलं. ज्यामुळे त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणखी प्रचंड वाढलं. तुम्हाला प्रेमात एकमेकांना सन्मान द्यायला हवा..’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. 74 वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. (dharmendra first movie)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.