“लोकांना वाटतं आम्ही वेगळे झालो..”; सनी-बॉबी देओलसोबतच्या नात्यावर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. त्यावेळी धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलं होती. सनी, बॉबी ही दोन मुलं आणि विजेता, अजेता या दोन मुली त्यांना होत्या. प्रकाश कौर असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे.

लोकांना वाटतं आम्ही वेगळे झालो..; सनी-बॉबी देओलसोबतच्या नात्यावर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
Hema Malini and Deol familyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 12:02 PM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकला. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. करणचे आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हेसुद्धा त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत दिसले. मात्र या सर्वात धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी-अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली कुठेच दिसल्या नव्हत्या. त्यामुळे या दोन कुटुंबांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि बॉबी देओल या दोन सावत्र मुलांसोबतच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ईशा देओलने सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. यावेळी ती तिच्या दोन भावंडांसोबत दिसली होती. सनी आणि बॉबीने मिळून ईशासोबत फोटोसाठी पोझ दिले होते. याविषयी विचारलं असता हेमा म्हणाल्या, “मला खूप आनंद झाला आणि यात मला काही नवीन वाटत नाही. कारण ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. अनेकदा ते आमच्या घरी येतात. पण त्याविषयी कधी कुठे छापलं जात नाही. आम्ही भेटीगाठीनंतर लगेच फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नाही. आमचं कुटुंब तसं नाही.”

हे सुद्धा वाचा

“आम्ही सर्वजण नेहमी एकत्र असतो. कोणतीही समस्या असली तरी आम्ही नेहमी एकमेकांसोबत असतो. स्क्रिनिंगच्या वेळी ते सर्वांना दिसलं आणि ही चांगलीच गोष्ट आहे. मी सुद्धा खुश आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं. आमचं कुटुंब वेगळं झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, पण तसं काहीच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर दोन्ही कुटुंब मिळून रक्षाबंधन साजरा करत असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं.

“हे खरंच हास्यास्पद आहे, की आम्ही वेगळे झालोय असं लोकांना दाखवायचं असतं. पण आम्ही एक संपूर्ण कुटुंब म्हणून कायम एकत्र आहोत. काही कारणास्तव आम्ही लग्नाला (करण देओलच्या) उपस्थित राहू शकलो नव्हतो पण तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. सनी आणि बॉबी हे सुरूवातीपासूनच रक्षाबंधननिमित्त आमच्या घरी येतात”, असं त्या पुढे म्हणाल्या.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. त्यावेळी धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलं होती. सनी, बॉबी ही दोन मुलं आणि विजेता, अजेता या दोन मुली त्यांना होत्या. प्रकाश कौर असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा, अहाना या दोन मुली आहेत. धर्मेंद्र हे आजही प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.