Hema Malini: धर्मेंद्र यांच्याप्रमाणे हेमा मालिनी देखील किसिंग सीनसाठी सज्ज, म्हणाल्या…
Hema Malini: 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमातर धर्मेंद्र यांची रुपेरी पडद्यावर किसिंग सीन दिल्यानंतर हेमा मालिनी देखील किसिंग सीनसाठी तयार... सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्य वक्तव्याची चर्चा...
मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर दोघांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. हेमा मालिनी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तर दुसरीकडे धर्मेंद्र नुकताच दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर सिनेमा धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना अझमी यांच्या किसिंग सीनमुळे तुफान चर्चेत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर पत्नी हेमा मालिनी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं.
पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मोठा खुलासा केला आहे. मोठ्या पडद्यावर किसिंग सीन देण्यास काही हरकत नाही… असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांनी किसिंग सीनवर केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
मुलाखतीत हेमा मालिनी यांना, ‘धर्मेंद्र आणि शाबाना यांच्याप्रमाणे तुम्ही मोठ्या पडद्यावर किसिंग सीन देवू शकता…’ यावर अभिनेत्री सकारात्मक उत्तर देत म्हणाल्या, ‘का नाही करणार? जर ते चांगलं असेल आणि ते सिनेमाशी संबंधित असेल तर कदाचित मी ते करू शकेन…’ असं हेमा मालिनी म्हणाल्या..
काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर मोठी प्रतिक्रिया दिली होती. ‘धर्मेंद्र यांच्यासाठी मी आनंदी आहे. धर्मेंद्र यांना कॅमेऱ्यासमोर राहायला आवडतं. त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडला असेल..’ फक्त हेमा मालिनी नाही तर, धर्मेंद्र यांनी देखील किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली होती.
सिनेमातील किसिंग सीनबद्दल धर्मेंद्र म्हणाले, ‘सिनेमातील शबाना आणि माझ्या किसिंग सीनमुळे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी आमचं कौतुक देखील केलं. मला वाटतं की लोकांना हे अपेक्षित नव्हतं आणि ते अचानक घडलं, म्हणूनच प्रतिक्रिया येत आहेत.’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांचा किसिंग सीन आणि हेमा मालिनी यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्न केलं. लग्नानंतर एका वर्षानंतर हेमा मालिनी यांनी १९८१ साली ईशा देओल हिला जन्म दिला. त्यानंतर ४ वर्षांनंतर म्हणजे १९८५ साली हेमा मालिनी यांनी लहान मुलगी अहाना देओल हिला जन्म दिला.