Hema Malini: मथुरेतून निवडणुकीसाठी कंगनाची चर्चा होताच हेमा मालिनी यांनी का घेतलं राखी सावंतचं नाव?

बॉलिवूडच्या 'क्वीन'बद्दल 'ड्रीम गर्ल' असं का म्हणाली?

Hema Malini: मथुरेतून निवडणुकीसाठी कंगनाची चर्चा होताच हेमा मालिनी यांनी का घेतलं राखी सावंतचं नाव?
बॉलिवूडच्या 'क्वीन'बद्दल 'ड्रीम गर्ल' असं का म्हणाली?Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 7:07 PM

मथुरा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) निवडणूक लढण्याची चर्चा आहे. याचविषयी बॉलिवूडची ड्रीम गर्ल आणि मथुरेतून दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे. हेमा मालिनी यांनी दिलेलं उत्तर साधं आणि सरळ नव्हतं. त्यांनी उत्तर देताना चक्क राखी सावंतचं (Rakhi Sawant) नाव घेतलं. त्यामुळेच हेमा मालिनी यांच्या उत्तराची चर्चा होत आहे.

गेल्या आठवड्यात कंगना मथुरेत होती. तिच्या मथुरा दौऱ्यामुळेच तिथून निवडणूक लढवणार की काय, अशी चर्चा रंगू लागली. पत्रकारांनी अखेर आज (शनिवार) हेमा मालिनी यांना त्याविषयी प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना आधी त्या म्हणाल्या, “चांगली गोष्ट आहे.”

हे सुद्धा वाचा

निवडणुकीबद्दल बोलताना हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “तुम्हाला मथुरेत फक्त फिल्मी स्टारच हवे आहेत ना. उद्या राखी सावंत सुद्धा इथे येईल.”

पत्रकारांच्या प्रश्नावर हेमा मालिनी यांचं उत्तर-

पत्रकार- कंगना रनौत ही मथुरा लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. हेमा मालिनी- अच्छा, चांगली गोष्ट आहे. पत्रकार- त्यावर तुमचं काय मत आहे? हेमा मालिनी- मी काय मत मांडू? माझे विचार देवाच्या इच्छेवर अवलंबून आहेत. भगवान कृष्ण यांना जे हवंय, तेच ते घडवून आणतील. इथल्या बिचाऱ्या स्थानिक लोकांना खासदार होण्याची इच्छा असेल, तर त्यांना तुम्ही खासदार होऊ देणार नाही. तुम्ही हे ठरवलंच आहे की कोणी फिल्म स्टारच खासदार बनेल. मथुरेत फिल्म स्टारच आला पाहिजे का? उद्या राखी सावंतसुद्धा इथे येईल.

पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन हेमा मालिनी कारमध्ये बसल्या. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे अशी चर्चा होऊ लागली की कंगना रनौत यांचा मथुरेत खासदार म्हणून विचार करणंसुद्धा त्यांना आवडलं नसावं. हेमा मालिनी यांनी भाजपद्वारे मथुरेत दोनदा निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा त्यांचा विजय झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.