Ram Mandir : कसं आहे अयोध्या येथील राममय वातावरण? हेमा मालिनी खास फोटो पोस्ट करत म्हणाल्या…

| Updated on: Jan 22, 2024 | 11:40 AM

Ram Mandir : 'जय श्री राम....'. कसं आहे अयोध्या येथीव वातावरण, संपूर्ण देशभरात उत्साह... खास फोटो पोस्ट करत हेमा मालिनी म्हणतात...; सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा...

Ram Mandir : कसं आहे अयोध्या येथील राममय वातावरण? हेमा मालिनी खास फोटो पोस्ट करत म्हणाल्या...
Follow us on

Ram Mandir : बॉलिवूडची ड्रीम गर्ल आणि अभिनेत्री हेमा मालिनी फक्त अभिनय नाही तर शास्त्रीय नृत्यात देखील पारंगत आहेत. हेमा मालिनी यांनी नुकतेच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनापूर्वी रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादर केलं. सर्वत्र हेमा मालिनी यांच्या नृत्याची चर्चा रंगली आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हेमा मालिनी शास्त्रीय नृत्य सादर करतात. अयोध्या याठिकाणी सादर केलेल्या रामायण नाटकात हेमा मालिनी यांनी ‘सीते’ची भूमिका साकारली होती. 22 जानेवारीला हेमा मालिनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत. फक्त अयोध्या मध्येच नाही, तर संपूर्ण भारतात राममय वातावर झालं आहे. राम प्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारताचं लक्ष फक्त राम मंदिराकडे आहे.

सध्या हेमा मालिनी अयोध्या याठिकाणी आहेत. हेमा मालिनी यांनी अयोध्यामधील राममय वातावरणाबद्दल देखील ट्विट करत माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, अयोध्येतील संपूर्ण वातावरण राममय झालं आहे. सर्वत्र जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येचे राम मंदिर तयार झालं आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून मंदिरात मंगळ नाद गुंजणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

हेमा मालिनी ट्विट करत म्हणाल्या, ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा… गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जग या शुभ सोहळ्याची वाट पाहत आहेत… आता रामललाची प्राण प्रतिष्ठा पाहता येणार आहे… मला आता राममय वातावरणात प्रचंड आनंद होत आहे… सगळीकडे राम नाव गुंजत आहे… ‘जय श्री राम…’ एक खास फोटो पोस्ट करत हेमा मालिनी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेमा मालिनी यांच्याबद्दल खास गोष्टी

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्यनाट्य सादर केलं होतं. हेमा मालिनी यांनी सादर केलेल्या नृत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही वर्षांपासून हेमा मालिनी बॉलिवूडपासून दूर आहेत. हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. हेमा मालिनी सध्या राजकारणात सक्रिय आहेत. 2004 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. हेमा मालिनी मधुरा येथील खासदार आहेत.