हेमा मालिनी यांच्यासाठी असं काम करायचे धर्मेंद्र यांचे वडील, फार कमी लोकांना माहितेय सत्य
Hema Malini - Dharmendra | हेमा मालिनी गरोदर असताना सासूबाई आल्या होत्या भेटायला, पण सासरे अभिनेत्रीसाठी करायचे असं काम, फार कमी लोकांना माहिती आहे देओल कुटुंबातील सत्य... हेमा मालिकी आता मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...
बॉलिवूडची ड्रीम गर्ल आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आज अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे. नुकताच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण 44 वर्षांपूर्वी जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं, तेव्हा देओल कुटुंबातील आनंद नष्ट झालं होतं. धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.
धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यामुळे प्रकाश कौर प्रंचड नाराज होत्या. पण धर्मेंद्र यांना आई सतवंत कौर आणि वडील किशन सिंग देओल यांच्याकडून समर्थन मिळालं होतं. हेमा मालिनी यांनी त्यांच्या ‘हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ मध्ये सासू सतवंत कौर यांच्या भेटीचा देखील उल्लेख केला आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं तेव्हा प्रकाश कौर यांची मुलं मोठी होतं होती. आई सतत नाराज असल्यामुळे कुटुंबात देखील नाराजीचं वातावरण होतं. लग्नानंतर जेव्हा हेमा मालिनी पहिल्यांदा गरोदर राहिल्या तेव्हा अभिनेत्रीला भेटण्यासाठी साासूबाई गुपचूप आल्या होत्या.
हेमा मालिनी यांच्या त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहिलं आहे की, ‘धर्मेंद्र यांच्या आईचा स्वभाव प्रचंड चांगला होता. जेव्हा त्यांना माहिती पडलं की मी पहिल्यांदा आई होणार आहे. त्या मला भेटण्यासाठी जुहू येथील डबिंग स्टूडियोमध्ये आल्या होत्या.’ ‘मी धर्मेंद्र यांच्या आईला नमस्कार केला. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘बाळा कायम आनंदी राहा…’ त्या आनंदी आहेत, याच गोष्टीचं समाधान मला होतं.’ तेव्हा हेमा मालिनी यांना भेटली आहे.. याबद्दल सतवंत कौर यांनी कोणाला देखील सांगितलं नव्हतं..
हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये फक्त सासूबाईंबद्दल नाहीतर, सासऱ्यांबद्दल देखील लिहिलं आहे. सासरे किशन सिंग देओल कायम हेमा मालिनी यांना त्यांच्या वडिलांना भेटवण्यासाठी घेऊन जायचे.. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या नकळत कुटुंबातील इतर सदस्यांनी हेमा मालिनी यांचा स्वीकार सून म्हणून केला होता.
सांगायचं झालं तर, लग्नानंतर आजपर्यंत कधीच हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरात प्रवेश केलेला नाही. लग्नानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी नवीन घर घेतलं आणि दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.