Hema Malini | ट्रॅफिकला वैतागून हेमा मालिनी यांनी केला मुंबई मेट्रोने प्रवास; मुंबईकर झाले आश्चर्यचकीत!

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी या मेट्रोमधील सहप्रवाशांसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. मेट्रोनंतर त्यांनी उर्वरित प्रवास ऑटोरिक्षाने पूर्ण केला. डीएन नगर ते जुहू असा प्रवास त्यांनी केला होता.

Hema Malini | ट्रॅफिकला वैतागून हेमा मालिनी यांनी केला मुंबई मेट्रोने प्रवास; मुंबईकर झाले आश्चर्यचकीत!
Hema MaliniImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 1:12 PM

मुंबई : सेलिब्रिटी जेव्हा शहरात फिरण्याचा विचार करतात, तेव्हा ते सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय सहसा निवडत नाहीत. जरी प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला, तरी ते सर्वसामान्यांसाठी असामान्य दृश्य असतं. फारच क्वचित प्रसंगी असं काही पहायला मिळतं. म्हणूनच जेव्हा एखादी सेलिब्रिटी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करते, तेव्हा तो चर्चेचा विषय ठरतो. बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मंगळवारी चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास केला. त्यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वसामान्य प्रवासी आश्चर्यचकीत झाले होते.

भाजप खासदार हेमा मालिनी यांनी स्वत: ट्विटरवर या प्रवासाचे फोटो पोस्ट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की मुंबई उपनगरातून दहिसरला पोहोचण्यासाठी त्यांना कारने दोन तास लागले होते. हा प्रवाससुद्धा खूप थकवणारा होता. म्हणूनच त्यांनी कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोमुळे त्या अर्ध्या तासात पोहोचल्या. या प्रवासादरम्यानचा व्हिडीओसुद्धा त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी या मेट्रोमधील सहप्रवाशांसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. मेट्रोनंतर त्यांनी उर्वरित प्रवास ऑटोरिक्षाने पूर्ण केला. डीएन नगर ते जुहू असा प्रवास त्यांनी केला होता. हेमा मालिनी यांनी लिहिलं की जेव्हा त्या त्यांच्या घरी ऑटोरिक्षामधून उतरल्या, तेव्हा सुरक्षा रक्षक आश्चर्यचकीत झाले. रिक्षाच्या प्रवासाचाही खूप आनंद घेतल्याचं त्यांनी लिहिलं.

हेमा मालिनी यांचा मेट्रो प्रवास

हेमा मालिनी या राजकारणात सक्रिय आहेत. अभिनेत्रीसोबतच त्या कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगनादेखील आहेत. 2020 मध्ये त्यांनी ‘सिमला मिर्च’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. हेमा मालिनी यांनी आतापर्यंत शोले, सीता और गीता, दिल्लगी, राजा रानी, दो दिशायें, द बर्निंग ट्रेन, जुगनू, दिल का हिरा, ड्रीम गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.