Hema Malini | अनेक वर्षांनंतर हेमा मालिनी यांनी मनातील इच्छा बोलून दाखवलीच

Hema Malini | गेली अनेक वर्ष हेमा मालिनी ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होत्या, ती गोष्ट अखेर त्यांनी सर्वांसमोर बोलूनच दाखवली... सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांचीच चर्चा

Hema Malini | अनेक वर्षांनंतर हेमा मालिनी यांनी मनातील इच्छा बोलून दाखवलीच
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 1:25 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री हेमा मालिनी कायम कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. विवाहित अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न… लग्नानंतर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणी.. लग्नानंतर देखील हेमा मालिनी यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. १९८० साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे हेमा मालिनी यांच्या नात्याला अभनेत्रीच्या कुटुंबियांचा नकार होता. पण अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केल्यामुळे दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि सर्वांच्या विरोधात जावून दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर आजही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी गेलेल्या नाहीत. एवढंच नाही तर, आजही हेमा मालिनी यांना तडजोड करत आयुष्य जगावं लागत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमा मालिनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार झाल्या आहेत. हेमा मालिनी म्हणाल्या, ‘निर्मात्यांनी माझ्या घरी यावं आणि मला सिनेमात काम करण्याची संधी द्यावी… असं मला वाटतं.. पुन्हा पदार्पणासाठी मी तयार आहे..’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी बॉलिवूडपासून दूर आहेत. २०२० साली हेमा मालिनी यांचा ‘शिमला मिर्च’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा अपयशी ठरला. हेमा मालिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनय विश्वापासून दूर असल्या तरी त्या कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

एवढंच नाही तर, हेमा मालिनी यांनी ‘गदर २’ आणि ‘पठाण’ सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ”गदर २’ आणि ‘पठाण’ सिनेमाला यश मिळालं कारण प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहायचा आहे. ओटीटी फक्त टाईमपास आहे…’ असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं आहे.

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘ओटीटी वरील सीरिज आणि सिनेमे फक्त टाईमपाससाठी ठिक आहेत. पण ते किती चांगलं आहे, हे माहिती नाही…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या. एवढंच नाही तर, हेमा मालिनी सिनेमांमध्ये किसिंग सीन करण्यासाठी देखील तयार आहेत.

अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात अभिनेत्री शबाना आजमी यांच्यासोबत किसिंग सीन दिला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. यावर हेमा मालिनी, समी देओल, ईशा देओल यांनी देखील प्रतिक्रिया दिली होतीच. सध्या सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.