Valentines Day 2023 : ‘प्रपोज करुन झालं होतं, पण…’, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तने हेमांगी कवी हिने ताज्या केल्या जुन्या आठवणी

हेमांगी कवी हिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पतीसाठी केलेली पोस्ट तुफान चर्चेत... पहिला व्हॅलेंटाईन डे, अंगठी आणि अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक आठवणी...

Valentines Day 2023 : 'प्रपोज करुन झालं होतं, पण...', व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तने हेमांगी कवी हिने ताज्या केल्या जुन्या आठवणी
हेमांगी कवी
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 5:18 PM

Valentines Day 2023 : आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस… आज अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आणि जुन्या आठवणी शेअर केल्या. सेलिब्रिटींनी देखील व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत आपल्या आवडत्या व्यक्तीवर असलेलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं. अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) हिने देखील व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पतीसाठी खास पोस्ट लिहिली. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेमांगीचा पहिला व्हॅलेंटाईन डे, अंगठी आणि अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक आठवणी… या पोटस्टच्या माध्यमातून समोर आल्या आहेत.

हेमांगीची व्हॅलेंटाईन डे निमित्त खास फेसबूक पोस्ट?

‘हे माझं पहीलं Valentine gift. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या Pizza Hut मध्ये साजरा केला होता पहीला वहीला valentine day. आयुष्यात पहील्यांदा Pizza खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता. हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! (अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो’

‘तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा! तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे. आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते. आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा!’ असं म्हणत अभिनेत्रीने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमांगी कायम तिच्या भूमिकेमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमांगी अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडताना दिसते. पण आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पोस्ट केल्यामुळे हेमांगी चर्चेत आली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.