हेमांगी कवी हिने असं काय ज्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला केलं अनफॉलो?

'उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे...', 'या' प्रसिद्ध व्यक्तीमुळे कमी झाली हेमांगी कवीच्या चाहत्यांची संख्या? अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट तुफान चर्चेत... पाहा काय म्हणाली हेमांगी कवी....

हेमांगी कवी हिने असं काय ज्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला केलं अनफॉलो?
हेमांगी कवी
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:08 AM

मुंबई : कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अनेक मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडतात. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कायम तिच्या भूमिकेमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमांगी अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडताना दिसते. दरम्यान अभिनेत्रीने ‘पठाण’ सिनेमावर एक फेसबूक पोस्ट केली. अभिनेता शाहरुख खान याचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेमांगी नवी पोस्ट अनेकांना आवडली, पण अनेकांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

काय आहे हेमांगीची फेसबूक पोस्ट?

‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.

मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!!

सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए!

पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी… झूमे जो पठान मेरी जान, महफिल ही लूट जाए!… सध्या हेमांगी पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, हेमांगीने पोस्टमध्ये शाहरुख खान याची चाहती असल्यामुळे अनेकांनी मला अनफॉलो केलं असल्याची म्हटलं आहे. सध्या सर्वत्र हेमांगी कवीच्या फेसबूक पोस्टची चर्चा आहे. ‘पठाण’ सिनेमाला क्रेंद्रस्थानी ठेवून अभिनेत्रीने फेसबूक पोस्ट लिहिली आहे.

सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे. अभिनेता शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींचा गल्ला गोळा करताना दिसत आहे. पठाण सिनेमाची क्रेझ फक्त भारतातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.