Pradeep Patwardhan: ‘..अन् काळजात धस्स झालं’, हेमांगी कवीने सांगितला प्रदीप पटवर्धन यांच्याविषयीचा ‘तो’ खास किस्सा

त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. अभिनेत्री हेमांगी कवीनेही (Hemangi Kavi) इन्स्टाग्रामवर प्रदीप पटवर्धन यांच्याविषयी पोस्ट लिहिली आहे.

Pradeep Patwardhan: '..अन् काळजात धस्स झालं', हेमांगी कवीने सांगितला प्रदीप पटवर्धन यांच्याविषयीचा 'तो' खास किस्सा
हेमांगी कवीने सांगितला प्रदीप पटवर्धन यांच्याविषयीचा 'तो' खास प्रसंग Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 4:02 PM

अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांनी वयाच्या 52व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या (Mumbai) राहत्या घरी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. अभिनेत्री हेमांगी कवीनेही (Hemangi Kavi) इन्स्टाग्रामवर प्रदीप पटवर्धन यांच्याविषयी पोस्ट लिहिली आहे. लहानपणीचा एक किस्सा तिने या पोस्टमधून सांगितला आहे. ‘मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते,’ असं म्हणत तिने त्यांच्या पहिल्या भेटीचा हा खास किस्सा सांगितला.

हेमांगी कवीची पोस्ट-

‘मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते. कळव्यात कुलकर्णी नावाचे डेंटिस्ट आहेत. अगदी माझ्या घराच्या किचनच्या खिडकीसमोर त्यांचं क्लिनिक. दुपारची 4 ची वेळ होती आणि माझ्या आईने चहा करत असताना उंचपुऱ्या देखण्या पुरुषाला क्लिनिकमध्ये शिरताना पाहिलं. मला आईने बोलवून घेतलं आणि सांगितलं अगं त्या क्लिनिकमध्ये प्रदीप पटवर्धन शिरलेत बहुतेक. मी म्हटलं ह्या काही काय? एवढा मोठा माणूस इथं कशाला येईल? आई म्हणाली अगं नाही तेच आहेत. शहानिशा करायला म्हणून मी गेले क्लिनिकजवळ आणि तेवढ्यात क्लिनिकचं दार उघडून एक प्रचंड हँडसम व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर चालत आलं. पहिला अभिनेता ज्याला मी इतकं जवळून पाहिलं होतं. काळजात धस्स झालं. काय बोलावं काय करावं सुचेना. आठ-नऊ वर्षाची मी त्यांना बघून घाबरून पळून आले आणि आईला सांगितलं अगं तेच आहेत! दुसऱ्या दिवशी शाळेत मी जाम शायनिंग मारली होती. मग त्यानंतर अनेक वेळा त्यांना त्या क्लिनिकमध्ये जाताना येताना पाहिलं. खूप वर्षांनी या क्षेत्रात आल्यावर त्यांच्यासोबत काम करायची संधीही मिळाली. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हा किस्सा त्यांना सांगितला. मी म्हटलं “मी तुम्हाला पाहिलं होतं लहानपणी”. त्यावर पट्या काका म्हणाले “कुणाच्या लहानपणी? माझ्या की तुझ्या?” मी म्हटलं “अहो माझ्या” तर त्यांच्या विशिष्ट अशा स्टाईलमध्ये मानेला झटका देऊन म्हणाले “हा मग ठिके, मी उगाच घाबरलो!” माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण घरी आल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचं होतं! असा मिश्किल, हँडसम आणि टायमिंगचा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन! आठशे खिडक्या नवशे दारंवरचा तुमचा डान्स म्हणजे ओहोहो! व्हिल मिस यू,’ अशी पोस्ट हेमांगीनं लिहिली.

हे सुद्धा वाचा

नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच क्षेत्रात प्रदीप पटवर्धन दिसले तरी सर्वांत जास्त ते नाटकातच गुंतले. उषा पटवर्धन या त्यांच्या आई. त्यांनी एके काळी मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने गाजवली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या मोरूची मावशी या नाटकाने सबंध महाराष्ट्राला झपाटून टाकलं होतं. याच नाटकाने त्यांना अनेक मराठी चित्रपट मिळवून दिले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.