‘वाकड्या बोलण्याला जमेल तितकी…’, 2022 मध्ये हेमांगी कवीने अनुभवलेले ‘ते’ क्षण

खास पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने ताज्या केल्या जुन्या आठवणी; अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र चर्चेत

'वाकड्या बोलण्याला जमेल तितकी...', 2022 मध्ये हेमांगी कवीने अनुभवलेले 'ते' क्षण
हेमांगी कवी
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 5:24 PM

मुंबई : २०२२ वर्षाला अखेरचा निरोप देत प्रत्येकाने मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं. अनेक सेलिब्रिटींनी देखील खास आठवणी शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री हेमंगी कवी हिने देखील फेसबूकवर एक खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आपल्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीनं चाहत्यांचं मनोरंजन करणारी हेमांगी पुन्हा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीने नव्या वर्षासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाली हेमांगी? मागच्या वर्षातला कामाचा आढावा घेतला तर २०२२ ची सुरूवातच Colors Marathi च्या ’लेक माझी दुर्गा’ या मालिकेने झाली. जुलै १५ ला ‘तमाशा Live’ प्रदर्शित झाला. ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर screening झालं. Awards मिळाली. या वर्षी लवकरच हा चित्रपट प्रर्दशित होईल.

भारत माझा देश आहे आणि वऱ्हाडी वाजंत्री सारखे चित्रपट प्रर्दशित झाले. पाचव्यांदा USA वारी झाली! मुंबईच्या ताज मध्ये वाढदिवसानिमीत्त चहा पिण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं! (हो, माझ्यासाठी ती achievement च आहे!

वरूण नार्वेकर या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर एका webseries निमित्त काम करायला मिळालं. रवी जाधवांच्या ‘ताली’ या आणखी एका webseries मध्ये माझ्या प्रेरणास्थानी असलेल्या सुश्मिता सेन सोबत screen share करायची संधी मला मिळाली!

भाडिपा या अत्यंत मेहनती समुहा सोबत एका महत्वाच्या विषयावर YouTube साठी Docufilm केली. दोन जाहिराती केल्या. योग्य वेळी याबद्दल सविस्तर सांगेनच. आणि वर्ष संपता संपता ‘Thanks Dear’ सारखं अप्रतिम असं नाटक माझ्या वाट्याला आलं!

या सगळ्यात शारिरीक स्वास्थ्याकडे बारीक दुर्लक्ष झालं. तमाशा Live च्या अपयशामुळे थोडी निराशा झाली पण इतर वेगवेगळ्या projects मुळे ती नाहीशी झाली. पण या सगळ्यात महत्वाचं मनाचं आरोग्य ते intact राहीलं! Social Media चं trolling मनावर घेतलं नाही.

वाकड्या बोलण्याला जमेल तितकी सरळ उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. प्रर्दशित झालेल्या चित्रपटांच्या Box office status ने हिरमोड जरूर झाला पण खचून गेले नाही. चित्रपटाला व्यवसायिक यश नाही मिळालं तरी माझ्या कामाचं कौतुक झालं! काम करताना मौज आली पाहीजे हेच मनात होतं!

आज नविन वर्ष सुरू होतंय. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी जे काम येईल त्याला १०० % न्याय द्यायचं ठरवलंय! तुमचं प्रेम, आशीर्वाद, लोभ असाच राहावा ही विनंती आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा Happy New Year!’ असं अभिनेत्री म्हणाली.

हेमांगी बद्दल सांगायचं झालं तर, स्वतःला खटकलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींवर स्वतःचं मत मांडणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीला अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.