#BanLipstick नक्की आहे तरी काय? अखेर ‘बॅन लिपस्टिक’चा उलघडा झाला…

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

#BanLipstick नक्की आहे तरी काय? अखेर 'बॅन लिपस्टिक'चा उलघडा झाला...
lipstick
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 7:36 AM

मुंबई : काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर या प्रश्नाचा उलगडा झाला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक!’ असे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण त्या दोघींना असा व्हिडीओ शेअर करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करण्यामागे कारण तिची आगामी वेब सीरिज असल्याचे सांगितले आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही ७ भागांची वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता या सर्व अभिनेत्री लिपस्टिकचे समर्थन का करत नाही, लिपस्टिकचा आणि या वेबसिरीजचा काय संबंध, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसिरीजमध्ये दडलेली आहेत.

‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे.

संबंंधीत बातम्या

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.