‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर नाचणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचा मृत्यू? पोस्ट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

आयेशाचा लग्नातील डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ या चित्रपटातील गाण्यावर तिने ठेका धरला होता. या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवरील तिच्या डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.

'मेरा दिल ये पुकारे' गाण्यावर नाचणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचा मृत्यू? पोस्ट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
Ayesha ManoImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 9:12 AM

लाहोर : काही महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आयेशा मानो नावाच्या या तरुणीने तिच्या स्वत:च्या मेहंदी कार्यक्रमात ‘मेरा दिल ये पुकारे आजा..’ या गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा व्हिडीओ केवळ पाकिस्तानच नाही तर भारत आणि इतर देशांमध्येही गाजला होता. या व्हिडीओमुळे आयेशा प्रकाशझोतात आली होती. नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बोलावण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे माध्यमांमध्येही तिने मुलाखती दिल्या होत्या. आता त्याच तरुणीबद्दल धक्कादायक माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आयेशाचा मृत्यू झाल्याची माहिती व्हायरल होत आहे.

आयेशाच्या मृत्यूच्या पोस्टने नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे, तर काहींनी त्या वृत्तामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र या बातमीच फक्त इतकंच सत्य आहे की आयेशाचं निधन झालं आहे. मात्र ती आयेशा ही पाकिस्तानी तरुणी आयेशा मानो नाही, तर आयेशा हनीफ आहे. या दोघांमधील साम्य म्हणजे दोघीसुद्धा टिकटॉकर आहेत. नावातही साम्य आढळल्याने सोशल मीडियावर हा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकजण आयेशा मानोचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानी न्यूज वेबसाइट एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळी जिन्ना मेडिकल सेंटरमधअये एक महिला टिकटॉकरचा मृतदेह आढळला. याप्रकरणी आयेशा हनीफचा पती मोहम्मद आदिल आणि सासू नुसरत सोबिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा हनीफ ही डीएचफ फेज 1 मध्ये एका घरातील प्रायव्हेट पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्या घराचा मालक अद्याप समोर आला नाही.

View this post on Instagram

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

आयेशा हनीफ आणि आदिल यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. आयेशाने स्वत:च्या मर्जीने ड्रग्जचा ओव्हरडोस घेतला किंवा तिला बळजबरीने देण्यात आला, अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

रातोरात प्रसिद्ध झाली आयेशा मानो

आयेशाचा लग्नातील डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ या चित्रपटातील गाण्यावर तिने ठेका धरला होता. या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवरील तिच्या डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर अनेकांनी तिच्याप्रमाणे डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केले होते. यात सेलिब्रिटींचाही समावेश होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.