Naga Chaitanya: सोभिताला डेट करण्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच व्यक्त झाला नाग चैतन्य; म्हणाला..

घटस्फोटानंतर नाग चैतन्य पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या तो अभिनेत्री सोभिता धुलीपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Naga Chaitanya: सोभिताला डेट करण्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच व्यक्त झाला नाग चैतन्य; म्हणाला..
Naga Chaitanya: सोभिताला डेट करण्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच व्यक्त झाला नाग चैतन्यImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 9:48 AM

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’च्या (Laal Singh Chaddha) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नाग चैतन्य आता जरी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असला तरी याआधी तो त्याच्या आणि समंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. घटस्फोटानंतर नाग चैतन्य पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या तो अभिनेत्री सोभिता धुलीपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयी प्रश्न विचारला असता नाग चैतन्यने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननने मुलाखतीत त्याला गर्लफ्रेंड सोभिताबद्दल प्रश्न विचारला. सिद्धार्थच्या प्रश्नावर नाग चैतन्य हसला आणि म्हणाला, “मी फक्त हसणार आहे.”

हैदराबादमधील जुबिली हिल्स याठिकाणी नाग चैतन्यने नवीन घर घेतलंय. या घराचं बांधकाम अद्याप सुरू आहे. याच घराजवळ नाग चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांना एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर घराची पाहणी केल्यानंतर दोघं एकाच कारमधून परत गेले. सोभिताचा ‘मेजर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती ज्या ज्या हॉटेलमध्ये थांबली, तिथे अनेकदा नाग चैतन्यला पाहिलं गेल्याचंही म्हटलं जातंय. नुकताच सोभिताने आपला वाढदिवसुसुद्धा हैदराबादमध्ये नाग चैतन्यसोबत साजरा केल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

याआधी समंथानेही सोशल मीडियावर नाग चैतन्य आणि सोभिता यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर तिखट प्रतिक्रिया दिली होती. एका लेखात असा दावा करण्यात आला होता की समंथाची पीआर टीम ही नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या अफेअरच्या बातम्या पसरवत आहे. याला उत्तर देताना समंथाने सोशल मीडियावर लिहिलं, ‘मुलीविषयी अफवा असल्यास- त्या खऱ्या असतील. मुलाविषयी अफवा असल्यास- त्या मुलीनेच पसरवल्या असतील. थोडीतरी बुद्धिमत्ता वाढवा. जे दोघं जण यात सहभागी होते ते कधीच त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तुम्हीसुद्धा यातून पुढे गेलं पाहिजे. तुमच्या कामावर, कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करा. आयुष्यात तुम्हीसुद्धा पुढे व्हा.’

कोण आहे सोभिता धुलिपाला?

सोभिता ही अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. ‘फेमिना मिस इंडिया अर्थ 2013’चा किताब तिने पटकावला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेली ‘मेड इन हेवन’ ही तिची सीरिज विशेष गाजली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.