Heyy Babyy सिनेमातील क्यूट मुलीचा ग्लॅमरस लूक, आता ओळखणं देखील कठीण
Heyy Babyy | 'हे बेबी' सिनेमात झळकलेल्या 'या' चिमुकलीला आता ओळखणं देखील कठीण, वयाच्या 20 व्या वर्षी दिसते प्रचंड ग्लॅमरस... सध्या चिमुकलीचे काही फोटो सोशल मीडियावर होत आहेत तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र तिच्या लूकची चर्चा...
सोशल मीडियावर कायम बालकलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानपणी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे चिमुकले तरुण वयात फार वेगळेच दिसतात. अशात त्यांना ओळखणं देखील कठीण असतं. आता देखील ‘हे बेबी’ सिनेमातील चिमुकलीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘हे बेबी’ सिनेमातील चिमुकलीची चर्चा आहे, जी आता 20 वर्षांची झाली आहे. तिला आता ओळखणं देखील कठीण झालं आहे..
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान स्टारर ‘हे बेबी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शन साजिद खान याने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कमाई केली. तीन अभिनेत्याशिवाय सिनेमात एक चिमुकली होती, त्या चिमुकली पूर्ण लाईमलाईट लुटली. क्यूट मुलीने चाहत्यांच्या मनावर राज्य केली. ती मुलगी आता 20 वर्षांची झाली आहे. आता तिला तुम्ही ओळखू देखील शकणार नाही.
View this post on Instagram
‘हे बेबी’ सिनेमात झळकलेल्या चिमुकलीचं नाव जुआना संघवी आहे. सोशल मीडियावर जुआना हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले जुआना हिचे फोटो तिच्या 20 व्या वाढदिवसाचे आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
जुआना हिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जुआना हिचं बॉलिवूडमधील पदार्पण दमदार असेल…’, दुसरा युजर म्हणाला, ‘हिला सिनेमांमध्ये पुन्हा आणा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जुआना आता प्रचंड सुंदर दिसते…’ सांगायचं झालं तर, जुआना सध्या सिनेमांपासून दूर आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाउंट देखील प्रायव्हेट आहे.
दरम्यान, 2022 मध्ये फरदीन खानने जुआनाचा एक फोटो ट्विट केला होता. शूटिंगदरम्यानची काही माहितीही त्याने शेअर केली. एंजल उर्फ जुआना हिला सेटवर कोणता त्रास होवू नये म्हणून त्याने धूम्रपान सोडल्याचे त्याने सांगितलं होतं. सध्या सर्वत्र जुआना हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.