‘हे बेबी’मधील ‘एंजल’ 17 वर्षांनंतर दिसते अशी; खळी पाहून नेटकरी म्हणाले..

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या भूमिका असलेल्या 'हे बेबी' चित्रपटातील चिमुकली एंजल तुम्हाला आठवतेय का? आता 17 वर्षांनंतर ती कशी दिसते हे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! जुआना संघवी असं तिचं नाव आहे.

'हे बेबी'मधील 'एंजल' 17 वर्षांनंतर दिसते अशी; खळी पाहून नेटकरी म्हणाले..
'हे बेबी' या चित्रपटातील चिमुकलीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:39 AM

अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हे बेबी’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने कधी प्रेक्षकांना हसवलं तर कधी भावूकसुद्धा केलं. साजिद खान दिग्दर्शित हा चित्रपट ‘थ्री मेन अँड अ बेबी’ या अमेरिकी चित्रपटावर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये या तीन मुख्य अभिनेत्यांशिवाय एक गोड मुलगीसुद्धा होती. क्युट दिसणाऱ्या एंजलने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटात एंजलच्या भूमिकेत दिसणाऱ्या या चिमुकलीचं खरं नाव जुआना संघवी असं आहे. आता तीच चिमुकली मोठी झाली असून 17 वर्षांनंतर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. जुआनाचे आताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

जुआनाने ‘हे बेबी’ या चित्रपटातून केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नव्हती तर त्यातील कलाकारांनाही तिने प्रभावित केलं होतं. जानेवारी 2022 मध्ये फरदीन खानने ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. ‘छोट्या जुआनासोबत सीन शूट करण्यासाठी मी सिगारेट पिणं सोडून दिलं होतं’, असं त्याने सांगितलं होतं. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खानसारखे नामवंत कलाकार असताना चिमुकल्या मुलीने सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं होतं. हीच जुआना आता 20 वर्षांची झाली आहे. तिचे आताचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

हे सुद्धा वाचा

जुआनाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. तिच्या गालावरील खळी पाहून नेटकरी तिची तुलना प्रिती झिंटाशी करत आहेत. अनेकांनी तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हे बेबी’नंतर जुआना नंतर कोणत्याच चित्रपटात किंवा जाहिरातीत झळकली नाही. ती सध्या लाइमलाइटपासून दूर असून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.