शाहरुख, सलमान खान नाही तर, ‘हा’ आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटाचे घेतो कोट्यवधी रुपये

Bollywood Actor : बॉलिवूडचा 'हा' अभिनेता फक्त एका मिनिटासाठी एक दोन नाही तर घेतो इतके कोटी, त्याच्यासमोर शाहरुख खान, सलमान खान देखील फेल... अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत केलं आहे चाहत्यांचं मनोरंजन

शाहरुख, सलमान खान नाही तर, 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटाचे घेतो कोट्यवधी रुपये
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 12:07 PM

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : आजच्या घडीला सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. पण पूर्वीचे सेलिब्रिटी फक्त हजार रुपयांमध्ये सिनेमांमध्ये काम करायचे. जवळपास तीन वर्षांपूर्वीपासून सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेतात. आता सेलिब्रिटींचं मानधन दिवसागणिक वाढत आहे. आजच्या घडीला सेलिब्रिटी एका सिनेमासाठी 100 कोटी मानधन घेतात. पण भारतातील एक अभिनेता असा आहे, जो एका मिनिटासाठी कोट्यवधी रुपये घेतो. तुम्हाला वाटलं असले शाहरुख खान, सलमान खान यांच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याला इतकं मानधन मिळत नसेल. भारतातील सर्वात महागडा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता अजय देवगन आहे.

कमाईच्या बाबतीत आमिर खान, शाहरुख खान, प्रभास, रजनीकांत, सलमान खान आणि थलपथी विजय यांसारख्या सेलिब्रिटींची नावे यादीत अव्वल आहेत. या सर्व सेलिब्रिटींची कमाई प्रत्येक सिनेमातून 100 कोटींपेक्षा अधिक आहे. काहींनी त्यांच्या सर्वात हिट सिनेमांमधून नफा वाटून 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सांगायचं झालं तर, सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना देखील अजय याने मागे टाकलं आहे. अजय देवगन याने एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. ज्यासाठी अभिनेत्याने 35 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. सिनेमात अभिनेत्याने फक्त 8 मिनिटांची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्याने एका मिनिसाठी तब्बल 4.5 कोटी मानधन घेतलं होतं.

अजय देवगन एका फ्लॅशबॅक सीनमध्ये श्रिया सरनसोबत RRR मध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता. या बिग बजेट सिनेमासाठी अजयला मोठी रक्कम मिळाली. सांगायचं झालं तर, सिनेमासाठी अजय देवगन याची फी 35 कोटी रुपये आहे. सिनेमात अभिनेत्याची मुख्य भुमिका असेल तर कमाईतील 50 टक्के भाग अजय याचा असतो. ‘दृष्यम 2’ सारख्या सिनेमामध्ये अभिनेत्याने 100 कोटी रुपये मानधन घेतल्याची देखील माहिती समोर आली.

अजय देवगन याचे आगामी सिनेमे

अजय देवगन लवकरच सिंघम अगेन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अजय देवगन याच्यासोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.