‘हम आपके हैं कौन’आणि ‘हम साथ-साथ है’ या सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारल्यामुळे आलोक नाथ यांची ओळख बॉलिवूडचे ‘संस्कारी बाऊजी’म्हणून झाली. आलोक नाथ यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा अनेक अभिनेत्री आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. स्वतःवर गंभीर आरोप झाल्यानंतर आलोक नाथ यांनी झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. त्यानंतर आलोक नाथ कधी समोर आलेच नाही.
दरम्यान, आलोक नाथ यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीने त्यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांचं एक सत्य सांगितलं होतं. दारू प्यायल्यानंतर आलोक नाथ यांची वागणूक बदलते… असं वक्तव्य हिमानी शिवपुरी यांनी केलं होतं.
हिमानी शिवपुरी म्हणाली, ‘मी भूतकाळात अनेकदा त्यांच्यासोबत काम केसले आहे. जेव्हा ते दारु पीत नाहीत, तेव्हा ते संस्कारी असतात. ‘हम आपके हैं कोन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आलोक नाथ यांनी दारु प्यायल्यानंतर गोंधळ घातला होता.’
‘सिनेमाच्या सेटवर आलोक नाथ कायम शांत आणि प्रोफेशनल व्यक्ती प्रमाणे राहायचे. पण रात्री 8 वाजल्यानंतर त्यांची दुसरी बाजू समोर यायची. आलोक नाथ आणि त्यांच्या पत्नीसोबत एकदा प्रवास केला होता. दारूच्या नशेत ते नियंत्रणाबाहेर गेले.’
‘त्यांची पत्नी सतत त्यांना शांत राहाण्यासाठी सांगत होती. स्वतःला सांभाळा नाहीतर, आपल्याला विमानातून बाहेर काढतील…’ असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या होत्या. सांगायचं झालं तर, सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारल्यामुळे आलोक नाथ यांची ओळख बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबूजी’म्हणून झाली. आलेक नाथ यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिकेला चाहत्यांकडून देखील प्रचंड प्रेम मिळालं. रुपेरी पडद्यावर वडिलांची भूमिका साकारणारे आलोक नाथ खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत राहिले.