Hina Khan: हिना खानचा प्रेमात विश्वासघात, 13 वर्षांनंतर बॉयफ्रेंडशी झालं ब्रेकअप? पोस्ट चर्चेत
हिना खानच्या 'त्या' पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; विश्वासघाताबद्दल लिहिली पोस्ट
मुंबई: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे. हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फसवणुकीबाबत पोस्ट लिहिल्या आहेत. त्यामुळे तिच्या रिलेशनशिपमध्ये काही समस्या असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. हिना खान गेल्या अनेक वर्षांपासून रॉकी जयस्वालला डेट करतेय. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टमुळे या दोघांचं ब्रेकअप झालं की काय, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
हिना खानची पोस्ट-
‘विश्वासघात हे एकमात्र सत्य आहे जे टिकून राहतं’, अशी पोस्ट तिने लिहिली. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने रिलेशनशिपबद्दल लिहिलं आहे. ‘ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवण्यासाठी स्वत:ला माफ करायला विसरू नका. कधी कधी एक चांगलं मन वाईट गोष्टींना पाहू शकत नाही’, असं तिने म्हटलंय. तिच्या या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय.
हिनाने याआधी कधी असे पोस्ट लिहिले नव्हते, त्यामुळे काहीतरी नक्कीच बिनसलंय, असा अंदाज चाहत्यांना आहे. आता हिनाने तिच्या या स्टोरीज डिलिटसुद्धा केल्या आहेत. मात्र त्याआधी तिच्या स्टोरीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हिना आणि रॉकी गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती.
2009 मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून हिना खानने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल या मालिकेत सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून काम करत होता. मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली होती.
हिना बिग बॉसमध्ये गेली तेव्हा रॉकी तिला भेटायला आला आणि त्याच वेळी त्याने नॅशनल टीव्हीवर हिनाला प्रपोज केलं होतं. त्यावर हिनानेही त्याला होकार दिला होता.