‘घमंडी, इतका इतका ॲटिट्यूड बरा नाही..’; हिना खानवर भडकले नेटकरी

अभिनेत्री हिना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींसोबत ज्या पद्धतीने बोलते, त्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हिना फारच घमंडी आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. पहा नेमकं काय घडलं..

'घमंडी, इतका इतका ॲटिट्यूड बरा नाही..'; हिना खानवर भडकले नेटकरी
Hina KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 8:51 PM

मुंबई : 22 डिसेंबर 2023 | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान तिच्या फॅशन आणि लूक्समुळे अनेकदा चर्चेत असते. नुकतीच तिने निर्माते आनंद पंडित यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत हजेरी लावली. पार्टीत तिने पापाराझींसमोर फोटोसाठी काही पोझ दिले. हे पोझ देताना मात्र ती पापाराझींना असं काही म्हणाली, जे ऐकल्यानंतर नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. हिना खान खूप घमंडी आहे, इतका ॲटिट्यूड बरा नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

हिना खान पार्टीला पोहोचताच पापाराझी तिचे फोटो क्लिक करू लागले. यादरम्यान एका पापाराझीने हिनाला पोझ देण्यास सांगितलं. त्यावर तिने ज्यापद्धतीने प्रतिक्रिया दिली, ते नेटकऱ्यांना आवडलं नाही. म्हणूनच हिनाला ट्रोल केलं जातंय. पापाराझींनी पोझ देण्याची विनंती करताच हिना त्यांना म्हणते, “अच्छा, आता तुम्ही मला सांगणार का पोझ द्यायला?” असं म्हणून ती उपरोधिकपणे टाळ्यासुद्धा वाजवते. हिनाचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

हिचा ॲटिट्यूड किती वाईट आहे. तिला अशा प्रकारे उत्तर द्यायची काही गरज नव्हती. घमंडी, असं एकाने लिहिलं तर कॅमेरामन फक्त त्याचं काम करत होता. पण हिनाचं हे वागणं अजिबात योग्य नाही, असं दुसऱ्याने म्हटलंय. ती हो किंवा नाही म्हणून तिथून जाऊ शकत होती. पण उगाच ॲटिट्यूड दाखवण्याची गरज नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. हिनाने या पार्टीत डार्क पर्पल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या पार्टीला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, काजोल, सलमान खान, जॅकी श्रॉफ, हिमेश रेशमियाँ, हृतिक रोशन, राकेश रोशन, अमिषा पटेल यांसारखे बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.