अशा परिस्थितीत मी रोजा पाळला तर..; हिना खानच्या प्रकृतीविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त

अभिनेत्री हिना खानने नुकत्याच एका पोस्टद्वारे तिच्या आजारपणाचा खुलासा केला आहे. या आजारामुळे ती रमजानमध्ये रोजा करू शकत नाहीये. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना घरगुती उपाय सुचवण्यास सांगितलं आहे.

अशा परिस्थितीत मी रोजा पाळला तर..; हिना खानच्या प्रकृतीविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त
Hina KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 10:23 AM

मुंबई : 15 मार्च 2024 | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून, ते पाहून चाहते तिच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत. हिनाने तिच्या या नव्या पोस्टमध्ये आजारपणाचा खुलासा केला आहे. हिनाने तिच्या हाताचा फोटो पोस्ट केला असून त्यावर एक खजूर पहायला मिळतंय. या फोटोसह तिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘मला गंभीर गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स (GERD) आहे. या आजारपणात जर मी रमजानचा उपवास केला तर माझी प्रकृती आणखी खराब होईल. माझी आई म्हणते की अजवा खजूर खाल्ल्याने थोडा आराम मिळतो,’ असं तिने लिहिलंय.

या पोस्टमध्ये पुढे हिनाने नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना काही घरगुती उपाय किंवा टिप्स सांगण्याची विनंती केली आहे. हिनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये तिला उपायसुद्धा सांगितले आहेत. ‘दही खाल्ल्यानेही तुला बरं वाटेल’, असं एकाने लिहिलंय. तर ‘रोजा न करता तू बाकी गोष्टी पाळल्यास तरी चालेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तू स्वत:ची काळजी घे आणि आराम कर’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

तीन महिन्यांपूर्वीच हिना रुग्णालयात दाखल होती. ‘माझ्यासाठी गेले तीन-चार रात्र खूप कठीण गेले. कारण मला खूप ताप आहे आणि सतत तापमान 102-103 च्या आसपासच आहे. जे लोक माझ्या आरोग्याची चिंता करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच बरी होऊन परतेन”, असं तिने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत लिहिलं होतं.

हिना खानने स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती बिग बॉस या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. नुकताच तिचा ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हिनाच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. चित्रपट आणि मालिकांशिवाय हिनाने काही म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलंय. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.