सर्वसामान्य जनतेप्रमाणे कलाकारांना देखील घेता येणार ‘या’ दिवसाचा आनंद
सर्वसामान्य जनतेला ज्या दिवसाची प्रतीक्षा असते, 'त्या' दिवसाचा आनंद आता कलाकार देखील अनुभवू शकतात
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉइज (FWICE)ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कलाकारांना सर्वसामान्य जनतेप्रमाणे आनंद घेता येणार आहे. सर्वसामान्य जनतेला ज्याप्रमाणे सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद घेता येतो, त्याचप्रमाणे आता कलाकारांना देखील सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. सु्ट्ट्या प्रत्येकाला आवडतात. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत किंवा मित्र परिवारासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी सर्वसामान्य जनतेसह कलाकारांना देखील आवडतं.
अनेकांना सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंत घेता येतो. पण कलाकार मात्र कायम शुटिंगमध्ये व्यस्त असतात. एकही सुट्टी न घेता बॉलिवूड कलाकारांना वेळेत सिनेमाची किंवा मालिकेची शुटिंग पूर्ण करावी लागते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अभिनेता, अभिनेत्री शुटिंग पूर्ण करत असतात, तर दुसरीकडे लेखक स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त असतात.
पण आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉइजने घेतलेल्या ऐतिहासीक निर्णयानंतर कलाकारांना देखील सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. कलाकारांना आता होळी, दिवाळी आणि १५ ऑगस्ट यांसारख्या सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. आता कलाकारांनी सणांच्या दिवशी कुटुंबापासून दूर सेटवर काम करावं लागणार नाही.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने 2023 मध्ये इंडस्ट्रीतील सर्वांना सुट्टीची यादी प्रसिद्ध केली आहे. एवढेच नाही तर या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे बॉलिवूड कलाकार आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.
FWICE ने जारी केलेल्या यादीनुसार वर्षभरात एकूण 12 सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. FWICE घेतलेल्या निर्णयानुसार बॉलिवूड कलाकार आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस सुट्टी मिळेल.