‘हिंदू ॲक्टर-मुस्लीम ॲक्टर’वरून कंगना रनौत-उर्फी जावेद एकमेकींसोबत भिडल्या

तोकड्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असणारी उर्फी जावेद आता थेट भिडली कंगना रनौत हिच्यासोबत; हिंदू - मुस्लीम कलाकारांबद्दल दोघांची स्पष्ट भूमिका

'हिंदू ॲक्टर-मुस्लीम ॲक्टर'वरून कंगना रनौत-उर्फी जावेद एकमेकींसोबत भिडल्या
'मी फक्त कपड्यांसाठी...', उर्फी जावेद हिच्या वक्तव्यानंतर काय म्हणाली Kangana Ranaut ?
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 1:23 PM

Kangana Ranaut Vs Urfi Javed : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाला एकेकडे यश मिळत आहे, तर दुसरीकडे अद्यापही अनेक जण सिनेमाचा विरोध करताना दिसत आहेत. दरम्यान पठाण सिनेमावरुन सुरु झालेला वाद आता युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद जोर धरत आहे. कंगनाच्या ट्विटवर रिट्विट करत मॉडेल उर्फी जावेद हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. तर कंगनाने माय डिअर म्हणत उर्फीच्या रिट्विटचं उत्तर दिलं. ट्विटवर दोघी एकमेकींना भिडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कंगना ट्विट करत म्हणाली, ‘चांगलं निरीक्षण… या देशाने फक्त आणि फक्त खान यांच्यावर प्रेम केलं आहे. मुस्लिम अभिनेत्रींना तर डोक्यावर घेतलंय. त्यामुळे भारतात द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. जगात भारतासारखा दुसरा देश नाही. सध्या कंगनाने केलेलं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

कंगनाच्या ट्विटवर मॉडेल उर्फी जावेद हिने स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘हे कसं विभाजन आहे. मुस्लीम कलाकार, हिंदू कलाकार.. कलेचं धर्मात विभाजन झालेलं नाही. त्याठिकाणी फक्त कलाकार असतात.’ असं ट्विट उर्फीने केलं आहे. उर्फीच्या ट्विटवर कंगनाने उत्तर दिलं आहे. दोघींमध्ये रंगलेला ट्विटरवॉर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

उर्फीच्या ट्विटचं उत्तर देत कंगना म्हणाली, ‘माझी प्रेमळ उर्फी… असं झालं असतं तर हे एक आदर्श जग असतं. पण हे शक्य नाही’ जोपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड येत नाही, तोपर्यंत हा देश संविधानाने विभाजलेला दिसेल. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करू.. करूया ना? असा प्रश्नचिन्ह देखील कंगनाने यावेळी उपस्थित केला.

याआधी देखील कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून शाहरुख खान आणि पठाण सिनेमावर निशाणा साधला. प्रदर्शनापूर्वी सिनेमा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे.

पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. सिनेमाने जगभरात आतापर्यंत जवळपास ५५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे पुढे सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.