प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता Bruce Willis गंभीर आजाराने ग्रस्त; फिल्म इंडस्ट्रीला केला रामराम
'डाय हार्ड' (Die Hard) फ्रँचाइझीमधील जॉन मॅकक्लेनच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ब्रुस विलिस (Bruce Willis) यांनी बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. अफेसिया (aphasia) नावाच्या आजारामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या आजारामुळे त्यांच्या बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.
‘डाय हार्ड’ (Die Hard) फ्रँचाइझीमधील जॉन मॅकक्लेनच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ब्रुस विलिस (Bruce Willis) यांनी बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. ॲफेसिया (aphasia) नावाच्या आजारामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या आजारामुळे त्यांच्या बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. 67 वर्षीय ब्रुसच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. डाय हार्डसोबतच लूक हूज टॉकिंग, ट्वेल्व्ह मंकिज, द सिक्स्थ सेन्स, मूनराइज किंग्डम यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. ब्रुस यांच्या कुटुंबीयांना बुधवारी त्याच्या निवृत्तीची माहिती चाहत्यांना दिली. ‘ब्रुसचे कुटुंबीय म्हणून आम्ही त्याच्या चाहत्यांना हे सांगू इच्छितो की तो काही आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहे. त्याला ॲफेसियाचं निदान झालं असून त्याचा परिणाम त्याच्या विविध क्षमतांवर होत आहे. यामुळे खूप विचार करून ब्रुस त्याच्या अभिनयक्षेत्रातील करिअरपासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे’, अशी माहिती त्यांची पत्नी एमा हेमिंग विलिस यांनी दिली.
ॲफेसिया म्हणजे काय?
Aphasia ही एक अशी स्थिती आहे जी मेंदूच्या फाइलिंग सिस्टीममध्ये व्यत्यय आणते. यामुळे ॲफेसियाग्रस्त लोक त्यांना जे बोलायचं आहे, ते सांगू शकत नाहीत. कारण ते सांगण्यासाठी इच्छित शब्द ते आठवू शकत नाहीत. बोलताना मधेच ते काही शब्द विसरतात तर काही चुकीचे शब्द वापरतात. अस्पष्ट बोलण्यासोबतच त्यांना इतरांना समजून घेण्यातही अडचण येते.
ब्रुस यांच्या पत्नीची पोस्ट-
View this post on Instagram
“भाषा आणि बोलणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. जर मेंदूच्या भाषेच्या केंद्राला हानी पोहोचली असेल तर तर भाषा समजण्यास किंवा योग्य शब्द शोधण्यात अडचण निर्माण होते. पण मोटर फंक्शन कमी झाल्यामुळेदेखील ॲफेसिया होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळतं, पण तुमचा मेंदू तुमच्या जिभेला ते सांगण्यासाठी कमांड देत नाही. त्यामुळे तुम्ही ते सांगू शकत नाही”, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेविअर अँड अलाईड सायन्सेसचे (IHBAS) संचालक डॉ. राजिंदर धमिजा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.
हेही वाचा:
Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण
अमिताभ बच्चन यांनी हृषिकेशमध्ये केली गंगा आरती; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल