सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात हनी सिंह याने मोडला ‘तो’ मोठा नियम, थेट खुलासा, म्हणाला, एक वर्षापासून

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात हनी सिंह याने मोडला 'तो' मोठा नियम, थेट खुलासा, म्हणाला, एक वर्षापासून
Honey Singh and Sonakshi Sinha
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 6:41 PM

हनी सिंह याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे हनी सिंह याचे गाणे कायमच फेमस होतात. लूंगी डान्ससारखे जबरदस्त गाणे त्याने बॉलिवूडला दिली आहेत. हनी सिंह गेल्या काही वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होता. एक वेळ अशी होती की, हनी सिंह आयुष्यात काय करतोय हे कोणालाही माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्याने परत एकदा दमदार पद्धतीने पुनरागमन केले आहे. हनी सिंह हा पूर्णपणे नशेत होता. दिवसरात्र तो फक्त आणि फक्त नशा करत होता. आपल्या आजूबाजुला काय सुरू आहे हे देखील त्याला त्यावेळी कळत नव्हते. हनी सिंह याने त्याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा देखील केला होता.

नुकताच आता हनी सिंह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्याने मोठे खुलासे केले. हनी सिंह म्हणाला की, मी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नासाठी मुंबईमध्ये पोहोचलो होतो. त्याच्या अगोदर मी एक वर्ष दारू अजिबात पिलो नव्हतो. कारण मला काही दिवसांपूर्वी फक्त दारूच नाही तर त्यासोबतच अनेक नशिले पदार्थ घेण्याची सवय लागली होती.

मला काहीच कळत नव्हते, त्यानंतर मी खूप मेहनतीने त्यामधून बाहेर पडलो आणि दारू पण सोडली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या पार्टीला गेलो, तिथे सर्वजण जमले होते. मी दारू सोडली होती. पण सोनाक्षीच्या लग्नाच्या स्टेजवर जाण्याच्या अगोदर मी अर्धी बॉटल दारू पिली आणि तेथील वातावरणच माझ्या गाण्याने बदलून टाकले.

मी सोनाक्षीच्या लग्नाच्या पार्टीत खूप दारू पिलो. ज्यावेळी मी पिऊन बाहेर आलो, त्यावेळी तिथे पापाराझी देखील उपस्थित होते. पापाराझी यांनी मला दारूच्या नशेत बघितले. पुढे हनी सिंह म्हणाला की, मुळात म्हणजे दारू पिल्यानंतर मला काहीच कळत नाही. त्यामध्येच मी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या पार्टीत पिलो.

हनी सिंह याने सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात तब्बल एक वर्षानंतर दारू पिली. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला. हनी सिंह याने भारतात न राहण्याचे थेट कारणच सांगून टाकले. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानेच आपण भारतात राहत नसल्याचे हनी सिंह याच्याकडून सांगण्यात आले. सिद्धू मुसेवाला याची हत्या केलेल्या टोळीकडूनच आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे हनी सिंह याने म्हटले आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.