थेट चित्रपट निर्मात्याच्या पोटाला चावला ‘हा’ प्रसिद्ध गायक, अत्यंत हैराण करणारा प्रकार, खुलासा करत…
हनी सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हनी सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. त्याने त्या मुलाखतीमध्ये थेट भारतात न राहण्याचे कारणच सांगून टाकले.
हनी सिंह याने मोठा काळ गाजवला आहे. हनी सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले. हनी सिंह अनेक वर्षांपासून गायब होता, तो व्यसनामध्ये इतका जास्त होता की, त्याला काहीच कळत नव्हते. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना हनी सिंह हा दिसलाय. हनी सिंह याने भारतामध्ये न राहण्याचे कारणही थेट सांगून टाकले आहे. सिद्धू मुसेवाला याची हत्या करणाऱ्या टोळीकडूनच आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे हनी सिंह याने म्हटले. आपल्याला दुबईमध्ये सुरक्षित वाटत असल्याचेही हनी सिंह याने म्हटले आहे.
आता हनी सिंह याने अजून एक मोठा खुलासा केलाय. हनी सिंह म्हणाला की, मी ज्यावेळी नशेत असत, त्यावेळी मला काहीच कळत नव्हते. मी एकदा प्रोड्यूसर सुनील बोहरा यांच्या पोटाला चावलो. फक्त एकदा किंवा दोनदा नाही तर आठ वेळा त्यांच्या पोटाला चावलो. मला काहीच कळत नव्हते. त्यावेळी मी आयुष्यात सर्व पागल काम करत होतो.
त्याचा विचार मी आता केला तर मलाच वाटते की, मी काय करत होतो. हनी सिंह म्हणाला की, प्रोड्यूसर सुनील बोहरा माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी मला अनेक गोष्टी समजून सांगितल्या आहेत. एकदा मी सहा चरस आणि दीड बॉटल दारू पिऊन बोहरा यांच्या पोटाला चावलो. त्यांनी मला ते दुसरे दिवशी दाखवले आणि म्हटले की, सरदारजी साहब बघा तुम्ही काय केले ते…
त्यावेळी त्यांची पत्नी देखील त्यांच्या बाजुला बसली होती. मलाच कळत नव्हते की, काय बोलावे आणि काय करावे. कोणीही व्यक्ती असे करू शकतो का? मलाच आता या गोष्टीची लाज वाटते…मी पागल होतो. आता हनी सिंह याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून मोठे खुलासे करताना दिसतोय.
हनी सिंह जास्तीत जास्त वेळ विदेशात घालवताना दिसतोय. हनी सिंह म्हणाला की, माझे आयुष्य आता फक्त जिम, स्टुडिओ आणि घरापुरतेच मर्यादीत राहिले आहे. हनी सिंह याला काही दिवसांपूर्वीच थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हनी सिंह हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.