Hidden Camera | जेव्हा अभिनेत्रीला हॉटेल रुममध्ये दिसला हिडेन कॅमेरा; म्हणाली, ‘तो मुलगा अशा कामांमध्ये…’

अभिनेत्रीचे खासगी क्षण टिपण्यासाठी त्याने हॉटेल रुममध्ये लावला हिडेन कॅमेरा; आलेला धक्कादायक अनुभव शेअर करत अभिनेत्री म्हणाली... सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा...

Hidden Camera | जेव्हा अभिनेत्रीला हॉटेल रुममध्ये दिसला हिडेन कॅमेरा; म्हणाली, 'तो मुलगा अशा कामांमध्ये...'
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 12:25 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांना येत असलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात आणि त्यांच्या सतर्क राहण्याचा सल्ला देतात. आपण कुठेही फिरायला गेल्यानंतर सर्वातआधी हॉटेल बूक करतो. पण हॉटेल आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही, हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं असतं. कारण हॉटेल रुममध्ये लोकांचे खासगी क्षण टिपण्यासाठी हिडेन कॅमेरे लावलेले असतात. असाच धक्कादायक अनुभव अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हिला देखील आहे. जो अभिनेत्री अनेकांसोबत शेअर करत चाहत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीला आलेल्या अनुभवाची चर्चा रंगत आहे.

क्रिती खरबंद म्हणाली की, ज्या हॉटेल रुममध्ये अभिनेत्री थांबली होती. त्या रुममध्ये एक हिडन कॅमेरा लावण्यात आला होता. एका मुलाखतीत अभिनेत्री याबाबत मोठा खुलासा केला आहे. जेव्हा अभिनेत्री कोणत्याही हॉटेलमध्ये राहते, तेव्हा ती आणि तिची टीम हॉटेलमध्ये सर्वात आधी हॉटेलमध्ये हिडेन कॅमेरा आहे की, नाही… तपासून घेतात.

क्रिती म्हणाली, ‘कन्नड सिनेमाचं शुटिंग सुरु असताना एक धक्कादायक अनुभव आला. एक हॉटेल स्टाफ मेंबरने माझ्या रुममध्ये गुपचूप कॅमेरा लावला होता. जेव्हा मी आणि माझ्या टीमने रुमची झडती घेतली तेव्हा हिडेन कॅमेरा दिसला. तो मुलगा यात माहिर नव्हता, त्यामुळे त्याने कॅमेरा अतिशय वाईट पद्धतीने लावला होता…

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, त्याने कॅमेरा वाईट पद्धतीत लावल्यामुळे मी तो पाहिला. सेट टॉप बॉक्सच्या मागे कॅमेरा लपवला होता. हे खूप धक्कादायक होतं. अशा घटना टाळण्यासाठी, स्वत: सावध राहणे खूप महत्वाचं आहे. ‘ असा सल्ला देखील अभिनेत्रीने चाहत्यांना दिला…

फक्त क्रिती हिच नाही तर, याआधी दिया मिर्झानेही एका मुलाखतीत असा अनुभव टाळण्याबाबत वक्तव्य केलं होतं. जेव्हा हॉटेलमध्ये थांबते, तेव्हा सर्वात आधी रुम पूर्णपणे तपासून घेते. कारण काही हॉटेलमध्ये लोकांचे खासगी क्षण टिपण्यासाठी हिडेन कॅमेरे बसवलेले असतात. अशावेळी आपल्याला सुरक्षित आणि सतर्क राहण्याची गरज असते.

क्रिती हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘हाउसफुल ५’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमा २०२४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. क्रिती हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुलकित सम्राट याला डेट करत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.