जया बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारतात अमिताभ बच्चन? बिग बींकडून मोठा खुलासा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांनंतर केला मोठा खुलासा, पत्नी जया बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारतात बिग बी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

जया बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारतात अमिताभ बच्चन? बिग बींकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 10:40 AM

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील दोघांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी कायम चाहते उत्सुक असतात. बिग बी दोखील त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पत्नी जय बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारता? असा प्रश्न बिग बी यांना एका चाहत्याने विचारला. बिग बी यांनी देखील चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या अनोख्या अंदाजात दिलं.

‘कोन बनेगा करोडपती 15′ मध्ये नुकताच अमिताभ बच्चन यांनी बिहार येथील सुजीत कुमार याचं मोठ्या आनंदाने हॉट सीटवर स्वागत केलं. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात सुजीत कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यात गप्पा देखील रंगल्या. शो सुरू झाल्यानंतर सुजीत यांनी स्वतःची ओळख ड्रायव्हर म्हणून करुन देत बिहार लोकसेवा आयोगाची तयारी करत असल्याचं देखील सांगितलं.

स्पर्धक सुजीत म्हणाले, मी माझ्या पत्नील मॅडम जी… म्हणून हाक मारतो. सुजीत याचं बोलणं ऐकून बिग बी म्हणाले, मी देखील माझ्या पत्नीला मॅडम म्हणून बोलवायचो… कामाच्या वेळी फार सोयीचं व्हायचं. मॅडम जी जरा ऐकता का.. असं मी माझ्या पत्नीला म्हणायचो… आता मी त्यांना देवी जी म्हणून हाक मारतो…’ सध्या सर्वत्र बिग बी आणि जया बच्चन यांची चर्चा रंगलेली असते.

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं कपल बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन त्याच उत्साहाने आणि आनंदाने रुपेरी पडद्यावर दिसतात.

अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी पदार्पण केलं. पण बिग बी यांची बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात असलेली जागा कोणी घेऊ शकलेलं नाही. आजही चाहते अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. अमिताभ बच्चन लवकरच ‘प्रोजेक्ट के’ यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर त्यांचे अनुभव पोस्ट करत असतात. ब्लॉगच्या माध्यमातून देखील बिग बी चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

जया बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत होते. एवढंच नाही तर, जया बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.