Anant Ambani यांच्या ‘वंतारा’मध्ये कशी आणि कोणाला मिळते नोकरी, कशी होते भरती? जाणून घ्या
600 एकर जमीन... 8.5 कोटी झाडं..., अंबानी कुटुंबाचा लहाना मुलगा अनंत अंबानी काही दिवसांपासून 'वंतारा' मुळे चर्चेत, ज्यासाठी नीता अंबानी यांनी घेतलीये 1995 पासून मोठी मेहनत... सध्या सर्वत्र अंबानी कुटुंब आणि त्यांच्या 'वंतारा'ची चर्चा...
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच, अनंत अंबानी यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंट यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मोठ्या शाही थाटात राधिका – अनंत यांचा प्री-वेडिंग सेनेमनी साजरी करण्यात आली… दोघांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी फक्त भारतातील नाहीतर, जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती…
रिहानापासून मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स यांच्यापर्यंत दिग्गजांनी प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी उपस्थिती दर्शवली होती. प्री-वेडिंग सेरेमनीपूर्वी अनंत अंबानींचे वेगळे रूप जगासमोर आले. वन्य प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम आणि त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी स्वतः दिली होती.
वन्य प्राण्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘वंतारा’ची माहिती देताना अनंत अंबानी म्हणाले की, हे जगातील प्राण्यांसाठी सर्वात मोठे बचाव केंद्र आहे. जंगली प्राण्यांचं संवरक्षण करण्याची मला आवड आहे… मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची शिकवण मला माझ्या आईकडून मिळाली आहे… प्राण्यांची सेवा ही सर्वात मोठी सेवा असल्याचं मला सांगण्यात आलं आहे.
पुढे अनंत अंबानी म्हणाले, त्यांच्या आईने (नीता अंबानी) यांनी जामनगरमध्ये 1000 एकरचे जंगल तयार केले. 1995 पासून आईने खूप कष्ट केले आहेत. आईने जामनगरमध्ये टाउनशिप तयार केली आहेत. येथे त्यांनी 8.5 कोटी झाडे लावली. जगातील सर्वात मोठी आंब्याची बाग जामनगरमध्ये आहे.
जंगली प्राण्यासाठी रेक्स्यू सेंटर
अनंत अंबानी यांनी सांगितलं ती जंगली प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरची सुरुवात कोरोना काळात झाली. त्यासाठी 600 एकरमध्ये जंगल उभारण्यात आलं. जेथे सर्वात आधी हत्तींसाठी रेस्क्यू सेंटर तयार करण्यात आलं. येथे 2008 मध्ये पहिल्या हत्तीचे प्राण वाचवण्यात आले. अनंत अंबानी म्हणाले, ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू सेंटर 2020 मध्ये सुरू झालं
‘ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू सेंटरसाठी जवळपास 3 हजार लोकं काम करतात… ज्यामध्ये 20 ते 30 प्रवासी आहेत… प्रत्येक जण सेंटरमध्ये शिक्षक किंवा प्राध्यापकाच्या भूमिकेत काम करत आहेत.’
कशी मिळते याठिकाणी नोकरी?
नोकरीबद्दल अनंत अंबानी म्हणाले, येथे आम्ही पशुवैद्यकीय मध्ये पदवीधर असलेल्या लोकांना कामावर ठेवतो. याशिवाय आमच्याकडे चांगले डॉक्टर्स देखील आहेत, ज्यांना प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि त्यांच्या ‘वंतारा’ बद्दल चर्चा रंगली आहे.