Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नाचा आईवर काय परिणाम झाला? अखेर अरबाज खानने बोलून दाखवलं दु:ख

सलीम आणि हेलन यांनी अर्पिला खानला दत्तक घेतलं होतं. तर पहिल्या लग्नातून सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही त्यांची चार मुलं आहेत.

सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नाचा आईवर काय परिणाम झाला? अखेर अरबाज खानने बोलून दाखवलं दु:ख
Arbaaz Khan with motherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 2:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान सध्या त्याच्या ‘द इन्विन्सिबल्स’ या शोमुळे चर्चेत आहे. अरबाजच्या या शोमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासे केले. काही दिवसांपूर्वी अरबाजचे वडील सलीम खान यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ते त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले होते. आता अरबाज खानने त्याच्या एका मुलाखतीदरम्यान वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा त्याच्या आईवर काय परिणाम झाला, याविषयी प्रतिक्रिया दिली.

सलीम खान आणि सलमा यांचं लग्न 1964 मध्ये झालं. या दोघांना सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान आणि अलविरा खान ही चार मुलं आहेत. सलीम यांनी 1981 मध्ये अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिता खानला दत्तक घेतलं.

“दुसरं लग्न स्वीकारणं आईसाठी खूप कठीण”

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने सांगितलं की सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नाला स्वीकारणं त्याच्या आईसाठी खूप कठीण होतं. “तो काळ खूप कठीण होता. विशेषकरून माझ्या आईसाठी. मी आणि माझी भावंडंही तरुण होतो. मात्र त्यांनी या दुसऱ्या लग्नाचा आमच्या संगोपनावर काही परिणाम होऊ दिला नाही. आम्ही आधीसारखंच चांगलं आयुष्य जगत होतो. माझ्या वडिलांनी सन्मानाने दुसरं लग्न केलं होतं आणि हेलन यांना आमच्या आयुष्यात आणलं होतं”, असं अरबाज म्हणाला.

हे सुद्धा वाचा

हेलन यांची प्रतिक्रिया

अरबाज खानच्या शोमध्ये जेव्हा हेलन यांनी हजेरी लावली होती, तेव्हा त्यांनीसुद्धा दुसऱ्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “त्यांनी (सलीम खान) मला चित्रपटात भूमिका दिली होती. आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. तुझ्या आईसाठी (सलमा खान) तो काळ कठीण गेला असेल. पण नियतीलाच मला तुमच्याजवळ आणायचं होतं. मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. मला कधीच सलीम खान यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर करायचं नव्हतं”, असं हेलन म्हणाल्या.

1980 च्या दशकात सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम खान यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांचं हेलनसोबतचं नातं सर्वांनीच स्वीकारलं नव्हतं. अरबाजच्या शोमध्ये सलीम खान यांनी सलमासोबतच्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला होता. “आम्ही आधी लपूनछपून एकमेकांशी भेटायचो. मी सलमाला जेव्हा सांगितलं की मला त्यांच्या कुटुंबीयांशी भेटायचं आहे, तेव्हा सर्वजण मला बघण्यासाठी आले होते. जणू एखाद्या प्राणीसंग्रहालयात नवी प्राणी आला असावा, त्या पद्धतीने ते मला बघत होते”, अशा शब्दांत त्यांनी मजेशीर किस्सा सांगितला होता.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.