कशी सुरु झाली मुनमुन – राज यांच्या अफेयरची चर्चा? पूर्वी 15 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती ‘बबिता’

राज अनादकट याच्यासोबत रिपेशनशिपच्या चर्चा... पूर्वी देखील सेलिब्रिटींसोबत नात्याची चर्चा, 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत मुनमुनचे प्रेमसंबंध... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या नात्याची चर्चा...

कशी सुरु झाली मुनमुन - राज यांच्या अफेयरची चर्चा? पूर्वी 15 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती 'बबिता'
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 11:56 AM

मुंबई | 16 मार्च 2024 : झगमगत्या विश्वातील कलाकार त्यांच्या कामांमुळे कमी, पण खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि अभिनेता राज अदानकट यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. दोघांना साखरपुडा केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. तर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘ज्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही अशा गोष्टींचा विचार न करणं हाच एक उत्तम पर्याय आहे.’ मुनमुन दत्ता आता तिच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे. पण राजसोबत अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी कधी जोर धरला… याबद्दल जाणून घेऊ.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मुनमुन आणि राज यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेत एकत्र काम करत असल्यामुळे मुनमुन आणि राज यांच्यात घट्ट मैत्री झाली. ब्रेक दरम्यान कायम दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसले.

एवढंच नाहीतर, अनेक मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक देखील केलं. सोशल मीडियावर देखील मुनमुन आणि राज एकमेकांसोबत पोस्ट शेअर करु लगाले होते. मुनमुन सोबत रंगत असलेल्या नात्याच्या चर्चांमुळे देखील राज याने मालिकेचा निरोप घेतला. असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. पण अभिनेत्रीने असं काहीही नसल्याचं सांगितलं.

सतत रंगत असलेल्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे मुनमुन आणि राज यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. दरम्यान, राजच्या टीम यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ‘सोशल मीडियावर तुम्ही जे काही पाहात आहात, ऐकत आहात त्यामध्ये काहीही तथ्य नाही.’ असं म्हणत राजच्या टीमने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मुनमुन दत्ताचं 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत अफेअर

राज अदानकट याच्यापूर्वी मुनमुन अभिनेत्री अरमान कोहली याला डेट करत होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरमान याच्या रागीट आणि आक्रमक स्वभावामुळे मुनमुन हिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनमुन दत्ता हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.