करिना कपूर घरातील कर्मचाऱ्यांसोबत कशी वागते? सासूबाईंकडून अभिनेत्रीला मिळालेला ‘तो’ सल्ला

Kareena Kapoor : 'इतरांसोबत तुझी वागणूक योग्य आहे, पण घरातील कर्मचाऱ्यांसोबत...', कर्मचाऱ्यांसोबत कशी राहते करीना कपूर? सासूबाईंकडून सत्य अखेर समोर...., करीना कायम कोणत्या न कोणत्या कारणासाठी असते चाहत्यांमध्ये चर्चेत...

करिना कपूर घरातील कर्मचाऱ्यांसोबत कशी वागते? सासूबाईंकडून अभिनेत्रीला मिळालेला 'तो' सल्ला
करीना कपूर खान
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 8:23 AM

बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगायचं झालं तर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर बॉलिवूडचा निरोप घेतला. पण अभिनेत्री करीना कपूर हिने दोन मुलांच्या जन्मानंतर करियर सोडलं नाही. कुटुंब आणि करियर दोन्ही जबाबदाऱ्या अभिनेत्री योग्य पार पाडत आहे. करीना कपूर हिच्या सासूबाई आणि दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर देखील सून करीना हिचं कौतुक करतना दिसतात. एका मुलाखतीत शर्मिला यांनी करीना घारातील कर्मचाऱ्यांसोबत कशी वागते? याबद्दल देखील खुलासा केला होता.

शर्मिला टागोर सून करीना हिचं कौतुक करत म्हणाल्या होत्या, ‘मला करीनाचं कामात असलेलं सातत्य आवडतं. ज्याप्रकारे करीना सर्वांच्या संपर्कात राण्याचा प्रयत्न करते, ती गोष्ट मला प्रचंड आवडते. जर मी करीनाला कोणता मेसेज केला असले, तर ती तात्काळ रिप्लाय करते.’

‘मी घरी असेल तर करीना मला विचारते तुम्हाला काय खायला आवडेल. मला जे हवं आहे ते मला मिळतं. एवढंच नाहीतर, नाती कशी टिकवायची हे देखील करीनाला उत्तम प्रकारे माहिती आहे…’, अनेक ठिकाणी शर्मिला टागोर, करीना कपूर हिचं कौतुक करताना दिसतात.

पुढे स्वतः करीना विचारते मी माझ्या स्वभावात आणखी काय बदल करु शकते. यावर शर्मिला म्हणतात, ‘मला असं वाटतं तू जशी आहेस, तशीच राहा… मी स्वतः तुला घरातील कर्मचाऱ्यांसोबत काम करताना पाहिलं आहे. कर्मचाऱ्यांसोबत तुझा शांत स्वभाव मला आवडतो. माझ्यासोबत असे अनेक लोक आहेत, ज्यांना सहज तणाव येतो, त्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतात.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या.

सांगायचं झालं तर, करीना आणि अभिनेता सैफ अली खान यांचं लग्न 2012 मध्ये झालं. दोघांच्या लग्नात ठराविक पाहुण्यांनी निमंत्रण देण्यात आलं होते. सैफ आणि करिनाला आता दोन मुलं देखील आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. करीना कायम पती आणि दोन मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सैफ अली खान याच्या पहिल्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत केलं होतं. अमृता – सैफ यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान म्हणजे सावत्र मुलांसोबत देखील करीनाचे चांगले संबंध आहेत. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय सारा – इब्राहिम कोणताही सण करीना आणि तिच्या मुलांसोबत साजरे करतात. सैफ अली खान याचं कुटुंब कायम चर्चेत असतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.