Esha Deol | सनी – बॉबी यांना राखी बांधल्यानंतर ईशाला काय मिळालं? अभिनेत्री म्हणाली…
Esha Deol | भावाला राखी बांधल्यानंतर बहिणीला भेटवस्तू हवीच असते... ईशा देओल हिला देखील सावत्र भाऊ रक्षाबंधनच्या निमित्ताने देतात खास वस्तू, अभिनेत्री म्हणाली...
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : प्रत्येक भाऊ, बहीण रक्षाबंधन सणाच्या प्रतीक्षेत असतात. भावाला राखी बांधल्यानंतर बहीण भावाकडून भेटवस्तू मागते. अभिनेत्री ईशा देओल हिने देखील अभिनेते सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओल यांना राखी बांधली. शिवाय ईशाने भावांकडून भेटवस्तू देखील घेतली. ईशा ही सनी आणि बॉबी देओल यांची सावत्र बहीण आहे. सावत्र भावंड असून देखील धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबाच्या मुलांमध्ये प्रेमळ नातं आहे. दरम्यान, ईशा देओल हिने सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर, ईशाने सिनेमाची स्क्रिनिंगचं देखील आयोजन केलं होतं.
नुकताच रक्षाबंधन सण सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी देखील भावाला राखी बांधली. ईशा हिने देखील तिच्या भावांना राखी बांधली. एवढंच नाही तर, भावांना राखी बांधल्यानंतर भेटवस्तू म्हणून काय मिळालं… याबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगत आहे…
अभिनेत्री लहानपणापासून सनी देओल आणि बॉबी देओल यांना राखी बांधते. अभिनेत्री म्हणाली, ‘लहानपणी आम्ही वडिलांना राखी बांधायचो. त्यामुळे मला वडील आणि भावांकडून भेटवस्तू आणि पैसे मिळायचे. आता माझ्या भावांची संख्या मोठी आहे. कारण लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींची माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली आहे..’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘रक्षाबंधनच्या मिळालेले पैसे मी कधीही खर्च करत नाही..’ असं देखील ईशा देओल म्हणाली. एवढंच नाही तर, सर्व भावांची ईशा लाडकी बहीण आहे. दरम्यान, ‘गदर २’ सिनेमाच्या यशानंतर चार मुलांना एकत्र पाहिल्यानंतर धर्मेंद्र प्रचंड आनंदी झाले. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आनंद देखील व्यक्त केला होता.
अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमामुळे देओल कुटुंब चर्चेत आहे. सगल २१ दिवस सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘गदर २’ सिनेमाच्या २१ व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. ‘गदर २’ सिनेमा लवकरच ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
‘गदर २’ सिनेमाने २१ दिवशी तब्बल ७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत ४८१.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुढे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.