Sara Tendulkar | किती श्रीमंत आहे सचिन तेंडुलकर यांची लेक सारा? कमावते इतके कोटी
Sara Tendulkar | सारा तेंडुलकर कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते... सोशल मीडियावर देखील सारा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता सारा हिच्या कामाईची चर्चा रंगली आहे... साराच्या कमाईचा आकडा जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांचे लेक सारा तेंडुलकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सारा कायम भारतीय संघाचा क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत नात्यामुळे चर्चेत असतात. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता सारा, शुबमन याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे नाही तर, तिच्या कमाईमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगली आहे.
सारा तेंडुलकर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सारा लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया आणि इतर मार्गांनी सारा मोठी कमाई करते. रिपोर्टनुसार सारा हिची नेटवर्थ 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे. सोशल मीडियाशिवाय सारा जाहिरातींच्या माध्यमातून देखील कमाई करते. इन्स्टाग्रामवर सारा हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 5.2 मिलियन आहे.
View this post on Instagram
सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं, अनेक जाहिरातींमध्ये देखील सारा दिसली आहे. त्यामुळे सारा बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करेल अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
सारा तेंडुलकर – शुबमन गिल
क्रिकेटर हार्दिक पंड्या याने 2020 मध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे सारा – शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे.