Sonali Bendre: वेळ लवकर निघून जाते… ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त सोनाली बेंद्रेची काळजाला हात घालणारी पोस्ट

46 वर्षीय सोनाली बेंद्रेला जुलै 2018 मध्ये मेटास्टॅटिक कर्करोगाचं निदान झालं होतं. आता 'कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे' निमित्तानं तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. (How Time Flies... Sonali Bendre's heartbreaking post on the occasion of 'Cancer Survivors Day')

Sonali Bendre: वेळ लवकर निघून जाते... 'कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे' निमित्त सोनाली बेंद्रेची काळजाला हात घालणारी पोस्ट
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 12:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं आयुष्यातील काही क्षणांकडे वळून पाहिलं आहे आणि कर्करोगाशी लढाई करताना तिनं स्वत:ला कसं मजबूत ठेवलं याविषयी स्पष्टपणे सांगितलं आहे. 46 वर्षीय सोनाली बेंद्रेला जुलै 2018 मध्ये मेटास्टॅटिक कर्करोगाचं निदान झालं होतं.

‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ (Cancer Survivors Day) निमित्त खास पोस्ट

जून महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्तानं तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. आपण कर्करोगावर कशी मात केली आणि जगण्याची इच्छाशक्ती किती गरजेची असते हे तिनं या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोनाली बेंद्रेचं ट्विट (See Sonali Bendre’s tweet)

या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रेनं लिहिलं आहे की ‘वेळ कसा निघून जातो…आज जेव्हा मी मागे वळून बघते… मला माझी इच्छाशक्ती दिसते.. माझ्यातला कमकुवतपणा दिसतो, मात्र मुख्य म्हणजे मला असं वाटतं की ‘सी’ हा शब्द यानंतर माझं आयुष्य कसं असेल ते परिभाषित करत नाही.’ 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर सोनाली बेंद्रेनं उपचारासाठी न्यूयॉर्क गाठलं होतं. उपचारानंतर ती डिसेंबर 2018 मध्ये मुंबईमध्ये परत आली होती.

सोनाली पुढे म्हणाली की, ‘प्रवास कठीण असणार आहे, मात्र आशेनंच लढण्याचा प्रयत्न करते.’ वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनाली बेंद्रे अखेर टीव्ही शो इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती.

संबंधित बातम्या

Photo: सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या फोटोंचा नवा ट्रेंड; 90 च्या दशकातील झलक पाहा एकाच फ्रेममध्ये!

Kiara Advani : भरसमुद्रात कियाराचे जलपरीसारखी स्विमिंग; व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Ananya Pandey : अनन्या पांडेचा स्टायलिश अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.