Hrithik Roshan लवकरच अडकणार विवाहबंधनात? गर्लफ्रेंडसोबत नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Hrithik Roshan : सबा - हृतिक यांचा आणखी एक फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण, रोशन कुटुंबात पुन्हा वाजणार सनई - चौघडे? सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त सबा - हृतिक यांच्या नात्याची चर्चा.. फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Hrithik Roshan लवकरच अडकणार विवाहबंधनात? गर्लफ्रेंडसोबत नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 3:19 PM

Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) गेल्या कित्येक दिवसांपासून गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर, दोघे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता देखील हृतिक याने गर्लफ्रेंडसोबत खास फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सबा आणि हृतिक यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सबा हिने दिवाळी सण बॉयफ्रेंड हृतिक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. खुद्द हृतिक याने काही फोटो पोस्ट केले आहे. कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘सुंदर लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा…’ असं लिहिलं आहे. सबा हिला पुन्हा रोशन कुटुंबासोबत पाहिल्यामुळे हृतिक – सबा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हृतिक आणि सबा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिली पत्नी सुझान हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा आझाद हिची एन्ट्री झाली. तर दुसरीकडे सुझान अभिनेता अर्सनाल गोनी (Arslan Goni) याला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

दरम्यान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली. आता दोघे लग्नबंधनात कधी अडकतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

हृतिक रोशन याचे सिनेमे

हृतिक रोशन लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत ‘फायटर’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.