Hrithik Roshan | ‘मी तुझा चाहता होतो पण..’, जोधा अकबरच्या पोस्टवरून हृतिक रोशन ट्रोल

ऐतिहासिक कथानकाच्या या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं होतं. यामध्ये ऐश्वर्याने जोधाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील हृतिक-ऐश्वर्याच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचीही चर्चा झाली होती.

Hrithik Roshan | 'मी तुझा चाहता होतो पण..', जोधा अकबरच्या पोस्टवरून हृतिक रोशन ट्रोल
Jodha AkbarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 3:12 PM

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त हृतिकने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ‘जोधा अकबर’च्या आठवणींना उजाळा दिला. ऐतिहासिक कथानकाच्या या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं होतं. यामध्ये ऐश्वर्याने जोधाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील हृतिक-ऐश्वर्याच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचीही चर्चा झाली होती.

हृतिकने ‘जोधा अकबर’च्या सेटवरील काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आशुतोष गोवारीकर.. जोधा अकबरचा भाग बनवल्याबद्दल आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीसह माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. तुमच्या दिग्दर्शनाची आणि माझ्या उत्तम सहकलाकारांची आठवण मनात कायम राहील.’ मात्र हृतिकला ही पोस्ट शेअर करणं महागात पडलं आहे.

हे सुद्धा वाचा

जोधा अकबरच्या या पोस्टमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नेटकरी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘मी तुझा चाहता होतो, मात्र तू अकबरची भूमिका साकारून चूक केलीस.’ तर एका चाहत्याने जोधा अकबरच्या प्रेम कहाणीला बनावट म्हटलंय. काहींनी अकबरला निर्दयी म्हटलंय.

जोधा अकबरशी संबंधित आठवण सोनू सूदनेही केली शेअर

अभिनेता सोनू सूदने त्याच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र जोधा अकबर त्याच्या करिअरमधील अविस्मरणीय चित्रपट आहे. 2008 मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात सोनू सूदने राजकुमार सुजामलची भूमिका साकारली होती. मात्र सोनूची आई कधीच हा चित्रपट पाहून शकली नव्हती. चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने ही आठवण सांगितली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार महिन्यांआधी सोनू सूदच्या आईच्या निधन झालं होतं. त्यामुळे त्या हा चित्रपट कधीच पाहू शकल्या नव्हत्या.

“माझी आई इतिहासाची शिक्षिका होती. त्यामुळे ती मला ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्यास प्रोत्साहन द्यायची. तिच्यासाठीच मी या चित्रपटाला होकार दिला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची माझी खूप मदत केली होती. मात्र ती हा चित्रपट पाहू शकली नव्हती. जोधा अकबर प्रदर्शित होण्याच्या चार महिन्यांआधी आईचं निधन झालं होतं. मात्र जेव्हा मी चित्रपटाच्या प्रीमिअरला गेलो होतो, तेव्हा ती माझ्या जवळच बसली आहे, असा मला जाणवलं”, अशी आठवण सोनू सूदने सांगितली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.