हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचा कुटुंबावर काय परिणाम झाला? बहिणी सुनैना रोशनने सोडलं मौन

हृतिक आणि सुझान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या घटस्फोटाविषयी हृतिकची बहीण सुनैना रोशन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाचा रोशन कुटुंबीयांनी कसा सामना केला, याविषयी तिने सांगितलंय.

हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचा कुटुंबावर काय परिणाम झाला? बहिणी सुनैना रोशनने सोडलं मौन
हृतिक रोशन, सुनैना रोशन, सुझान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 11:48 AM

अभिनेता हृतिक रोशनने जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सुझान खानशी घटस्फोट घेतला. 2014 मध्ये हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले होते. काही दिवसांपूर्वीच सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खानने या घटस्फोटाविषयी प्रतिक्रिया दिली होती. आता हृतिकची बहीण सुनैना रोशन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भावाच्या घटस्फोटाविषयी आणि कुटुंबातील इतर समस्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. हृतिकचं त्याच्या बहिणीसोबत खूप जवळचं नातं आहे. ‘हर हेल्थ टॉक्स’ या मुलाखतीत सुनैनाने तिच्या कुटुंबीयांचं वर्णन ‘लढवय्ये’ असं केलंय. हृतिक-सुझानचा घटस्फोट, राकेश रोशन यांना झालेलं कॅन्सरचं निदान या संकटांचा कुटुंबाने कसा सामना केला, याविषयी तिने सांगितलं.

हृतिकच्या बहिणीची प्रतिक्रिया

सुनैना म्हणाली, “आम्ही खरंच लढवय्ये आहोत. आम्ही आमच्याच पद्धतीने एकमेकांना साथ देत असतो. माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ यांच्यात मी एक वेगळीच ताकद पाहिली आहे. मलाही ती ताकद त्यांच्याकडूनच मिळते. या सगळ्या संकटांचा सामना केल्यानंतर मला एका गोष्टीवर विश्वास आहे, ते म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मला त्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा आहे.” भाऊ हृतिक, वडील राकेश आणि क्रिकेटर विराट कोहली या तिघांना फिटनेससाठी प्रेरणा मानत असल्याचं तिने पुढे सांगितलं. “माझे आईवडील या वयातही इतके फिट आहेत, माझा भाऊ त्याच्या आरोग्यासाठी इतके प्रयत्न करत असतो, त्याच्या शरीरासाठी तो इतकी मेहनत घेत असतो आणि तो जे काही खातो.. ते सर्वकाही जवळून पाहिलं आहे”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

सुझानच्या भावाची प्रतिक्रिया-

सुझानशी घटस्फोटानंतर हृतिकसोबतच्या माझ्या नात्यात कोणतीच कटुता आली नाही. त्या दोघांचं नातं असतानाही आणि नसतानाही आम्ही नेहमी सारखेच वागत होतो. कारण अखेर त्याची मुलं ही माझीसुद्धा मुलंच आहेत. ते माझ्यासमोर लहानाचे मोठे झाले आहेत. या अशा सगळ्या गोष्टींसाठी जो समजूतदारपणा लागतो, तो आमच्यात आहे. घटस्फोट घेणं हा त्यांचा निर्णय होता आणि जे घडायचं होतं, ते घडलं”, असं झायेद खान म्हणाला होता.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 20 डिसेंबर 2000 रोजी लग्न केलं होतं. या दोघांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर मुलांचा सांभाळ दोघं मिळून करत आहेत. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय तर सुझान ही अर्सलान गोणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.