जेव्हा रोड ट्रिपवर निघालेल्या तीन मित्रांनी कमावले 174 कोटी, पुन्हा कधी होणार अशी तयारी?
अपने काम को अपनी जिंदगी के साथ कन्फ्यूज मत करो...; अनेक दिवसांनंतर भेटलेल्या मित्रांनी जेव्हा कमावले 174 कोटी, 'ते' तीन मित्र पुन्हा येणार एकत्र? सध्या सर्वत्र बॉलिवूड गाजवलेल्या तीन मित्रांची चर्चा... कोण आहेत 'ते' जाणून घ्या... तुमचाही उत्साह पोहोचेल शिगेला. नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात काही असे सेलिब्रिटी आहेत, जे अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. अनेक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडमधील मित्रांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. खास मित्र कायम आपल्या चांगल्या – वाईट परिस्थितीत सोबत असतो. बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा..’…. या सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, तरुणांना मैत्रीचं महत्त्व ठरवून दिलं. सिनेमातील गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. सिनेतील काही सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात..
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ सिनेमाला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. सिनेमा तीन मित्रांच्या रोड ट्रिपवर आधारलेला आहे. सिनेमात अभिनेता हृतिक रोशन, अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेता अभय देओल यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
हृतिक, फरहान आणि अभय यांच्या मैत्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ सिनेमाच्या सिक्वलची चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, फरहान अख्तर याने केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेता कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘काय म्हणतेस झोया अख्तर? मुलांना पुन्हा रोड ट्रिपवर निघायला हवं?’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
फरहान याच्या पोस्टवर हृतिक रोशन याने देखील कमेंट केली आहे. हृतीक रोड ट्रिपवर निघण्यासाठी तयार झाला आहे. अभय कमेंटमध्ये म्हणाला, ‘२०१२ पासून माझी बॅगवती पॅक आहे…’ सध्या सर्वत्र ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ सिनेमाच्या सिक्वलची तयारी सुरु आहे. अभिनेत्याच्या पोस्टनंतर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ सिनेमात फरहान याने इमरान या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शिका झोया अख्तर हिने केलं होतं. रोड ट्रिपवर निघालेल्या मित्रांनी बॉक्स ऑफिसवर तब्बल १७४ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. तर ५५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला होता.