Hrithik Roshan च्या पहिल्या पत्नीला बॉयफ्रेंडसोबत अशा कपड्यांत पाहून भडकले नेटकरी
हृतिक रोशन याची पहिली पत्नी पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; बॉयफ्रेंडसोबत सुझान हिला अशा कपड्यांत पाहून भेटकरे नेटकरी... व्हिडीओ व्हायरल
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान कायम तिच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत असते. हृतिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सुझान अभिनेता अर्सलान गोनी याला डेट करत असल्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण अद्यापही सुझान आणि अर्सनाल यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिलेली नाही. अशात दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. व्हिडीओमध्ये सुझान हिने घातलेल्या ड्रेसमुळे तिला टीकेचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुझान हिला तिच्या फॅशनमुळे आणि अर्सनाल याला डेट करत असल्यामुळे ट्रोल करत आहेत..
एक नेटकरी व्हिडीओ पाहून कमेंट करत म्हणाला, ‘आंटी तुला २ मुलं आहेत हे विसरली आहे का?’ तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ही काय फॅशन आहे’.. सध्या सर्वत्र सुझान आणि अर्सनाल यांच्या व्हिडीओची चर्चा रंगलेली आहे. तर दोघांच्या व्हिडीओवर अनेक जण लाईक्स आणि कमेंट करत आहेत…
View this post on Instagram
हृतिक आणि सुझान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर अनेक वर्ष एकमेकांना साथ दिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचं घटस्फोट झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुझान आणि हृतिक यांना दोन मुलं आहेत. घटस्फोट झाला असला तरी दोघे मुलांसाठी कायम एकत्र येतात.
घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. घटस्फोटानंतर हृतिक सबा आझाद हिला डेट करत आहे, तर दुसरीकडे सुझान अभिनेता अर्सनाल गोनी (Arslan Goni) याला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. (Sussanne Khan dating Arslan Goni)
महत्त्वाचं म्हणजे सुझान खान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली. आता दोघे लग्नबंधनात कधी अडकतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.
सुझान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री नसली तरी देखील सुझान खान हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.