Hrithik Roshan | ‘त्यांच्यावर काय परिणाम होणार?’, गर्लफ्रेंडला मुलांसोबत डिनरला नेल्याने हृतिक रोशन ट्रोल

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. नुकतंच या दोघांना डिनर डेटला जाताना पाहिलं गेलं. मात्र यावेळी फक्त हे दोघंच नव्हते, तर त्यांच्यासोबत हृतिकची दोन मुलंसुद्धा होती. हे पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Hrithik Roshan | 'त्यांच्यावर काय परिणाम होणार?', गर्लफ्रेंडला मुलांसोबत डिनरला नेल्याने हृतिक रोशन ट्रोल
गर्लफ्रेंडला मुलांसोबत डिनरला नेल्याने हृतिक रोशन ट्रोल Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 9:18 AM

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : अभिनेता हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचं नातं सुरुवातीपासूनच लपवलं नाही. मीडिया किंवा पापाराझींना न जुमानता हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच काय तर हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान हिचंसुद्धा सबासोबत मैत्रीपूर्ण नातं आहे. नुकताच हृतिक आणि सबाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डिनरसाठी वांद्रे इथल्या एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचला आहे. मात्र यावेळी त्याच्यासोबत फक्त गर्लफ्रेंड नाही तर दोन मुलंसुद्धा आहेत. रेहान आणि रिधान या दोन मुलांसह हृतिक-सबा फॅमिली डिनरला पोहोचले होते. हे चौघं आलिशान गाडीमधून बाहेर येत असताना पापाराझींनी व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यावर आता नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘मुलांसाठी वाईट वाटतं..’

वडील गर्लफ्रेंडसोबत, आई बॉयफ्रेंडसोबत.. या दोन मुलांवर त्याचा काय परिणाम होत असेल, असा सवाल एकाने केला. तर सबा आणि हृतिकच्या वयातील अंतरावरून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. ‘तीन मुलांसोबत डॅडी’ अशी उपरोधिक कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे. हृतिक आणि सबा यांच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. ती त्याची गर्लफ्रेंड नाही तर मुलगी दिसते, असंही अनेकदा म्हटलं गेलंय. तर हृतिकच्या मुलांसाठी वाईट वाटतं, असंही एका युजरने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

ट्रोलिंगवर काय म्हणाली सबा?

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सबाने ट्रोलिंगवर मौन सोडलं होतं. “मला असं वाटतं की हा आमच्या आयुष्याचाच एक भाग आहे. लोकांना फक्त इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यात स्वारस्य असतं. आपण त्याबद्दल काय करू शकतो? तुम्ही फक्त मान खाली घालून तुमचं काम करत राहा. त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर काही परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही हसत राहा आणि पुढे जा. माझ्या आयुष्यातील एकमेव भाग ज्याबद्दल मला सार्वजनिकपणे व्यक्त होताना आनंद होतो, ते म्हणजे माझं काम. त्याव्यतिरिक्त कोणताही विषय हा लोकांच्या चर्चेसाठी नाही”, असं ती म्हणाली.

हृतिक आणि सबा आझादच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.