Saba Azad | ऋतिक रोशन याच्या गर्लफ्रेंडने ट्रोलिंगवर केले मोठे भाष्य, सबा आझाद म्हणाली, माझ्यासाठी हे सर्व…
ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. रिपोर्टनुसार ऋतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लग्न करणार आहेत.
मुंबई : ऋतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) हे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. ऋतिक रोशन हा गेल्या काही वर्षांपासून सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना देखील दिसतात. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद हे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थेट विदेशात गेले. ऋतिक रोशन याने सबा आझाद हिचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये लंडनच्या रस्त्यावर फिरताना सबा आझाद ही दिसली. अनेकदा यांच्यावर टिका केली जाते.
ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी बऱ्याच लोकांना अजिबातच आवडत नाही. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यापेक्षा वयानी बऱ्याच मोठा आहे. इतकेच नाही तर ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या फोटोंवर लोक मुलगी आणि वडिलांची सुंदर जोडी अशाप्रकारच्या कमेंट करताना देखील दिसतात. सबा आझाद ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते.
ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशी सबा आझाद हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता नुकताच सबा आझाद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सबा आझाद ही मोठे खुलासे करताना दिसलीये. सबा आझाद हिने तिच्या पर्सनल लाईफबद्दल देखील मोठे भाष्य केले.
सबा आझाद म्हणाली की, मी खूप कमी वेळा घराच्या बाहेर पडते. मुळात म्हणजे मला अधिक वेळ हा घरात राहायला जास्त आवडते. माझ्यासाठी काही गोष्टी नक्कीच खूप जास्त वेगळ्या होत्या. मी काही गोष्टींना घाबरते. मात्र, आता मला समजले आहे की, पापाराझी हे फक्त त्यांचे काम करतात. परंतू मला माझ्यावर लक्ष ठेवलेले आवडत नाही.
ऋतिक रोशन आणि तिला ज्याप्रकारे ट्रोल केले जाते, यावर बोलताना देखील सबा आझाद दिसलीये. सबा आझाद ही म्हणाला की, मी नक्कीच दगडापासून तयार झालेली नाहीये. मलाही काही गोष्टींचे खूप जास्त वाईट वाटते. पण आता मला समजले आहे की, लोक आपल्याबद्दल जे काही विचार करतात, त्यासाठी मी नक्कीच जबाबदार नाहीये.
पुढे सबा आझाद म्हणाली, यामुळे आता आयुष्यामध्ये शांतता आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे लग्न करणार आहेत. इतकेच नाही तर लग्नानंतर शिफ्ट होण्यासाठी ऋतिक रोशन याने मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात घर खरेदी केले. सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे कायमच एकमेकांसोबत खास फोटो शेअर करताना दिसतात.