हृतिकच्या व्हायरल व्हिडीओची नेटक-यांमध्ये चर्चा, सोबत असलेली व्यक्ती जाणून घेण्यास चाहत्यांची उत्सुकता
हृतिकचा हा व्हिडीओ एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने म्हणजे योगेन शाहने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्यामध्ये हृतिक एका मुलीचा हात हातात घेऊन हॉटेलमधून बाहेर आला आहे, तसेच तो तिचा हात हातात घेऊन गाडीत जाताना सुध्दा दिसत आहे. त्यामध्ये हृतिकने निळ्या रंगाचा शर्ट घातला असून पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. त्यानंतर दोघेही एकाच गाडीतून गेल्याचे पाहावयास मिळत आहे.
मुंबई – बॉलिवूडचे (bollywood) अनेक सेलिब्रिटी (celebrity) नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. तसेच सध्या नेटकऱ्यांमध्ये इतकी चर्चा होते की, त्यातून विनोद असल्याचे सुध्दा काहीवेळा स्पष्ट झालं आहे. नुकताच हृतिक (hrithik roshan) एका मुलीचा हात हातात घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला आहे. हृतिक सुध्दा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तसेच अनेकदा चाहत्यांचे प्रश्नांचे उत्तर सुध्दा दिल्याचे पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे हृतिकचा चाहतावर्ग वेगळा असल्याचे मानले जाते. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर हृतिक त्या मुलीसोबत एकाच गाडीतून निघून गेल्याचं पाहावयास मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटक-यांनी अनेक प्रश्न विचारल्याचे कमेंटमध्ये पाहावयास मिळत आहे.
इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती व्हि़डीओ शेअर
हृतिकचा हा व्हिडीओ एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने म्हणजे योगेन शाहने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्यामध्ये हृतिक एका मुलीचा हात हातात घेऊन हॉटेलमधून बाहेर आला आहे, तसेच तो तिचा हात हातात घेऊन गाडीत जाताना सुध्दा दिसत आहे. त्यामध्ये हृतिकने निळ्या रंगाचा शर्ट घातला असून पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. त्यानंतर दोघेही एकाच गाडीतून गेल्याचे पाहावयास मिळत आहे.
View this post on Instagram
चाहत्यांना प्रश्न, ती खरंच हृतिकची गर्लफ्रेंड आहे का ?
हृतिकचा घटस्फोट झाल्यापासून त्याची गर्लफ्रेड कोण आहे याबाबत अद्याप चाहत्यांना काहीचं माहित नव्हतं. परंतु नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांनी कमेंट करून प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. अनेक दिवसांनी हृतिक हॉटेलबाहेर दिसल्यामुळे त्याच्या चाहत्यांना एक वेगळाच आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. आता त्याचा चाहत्यांना दिसलेली मुलगी नक्की कोण होती ? ती खरंच हृतिकची गर्लफ्रेंड आहे का ? असे प्रश्न पडले आहेत.
दीपिका पदुकोणसोबत येतोय नवा चित्रपट
तसेच हृतिक सगळ्यात शेवटी वॉर चित्रपटात दिसला होता. त्या चित्रपटाच हृतिक रोशन वाणी कपूर आणि टायगर श्रॉफसोबत दिसला होता. आता फायटर चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत सुध्दा घेत आहे. तसेच त्याच्यासोबत दीपिका पदुकोण सुध्दा मुख्य भुमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे हे दोघे पहिल्यांदाचं एका चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाचा रिमेक आहे. त्याचबरोबर सैफ अली खान सुध्दा असल्याची चर्चा आहे.