सुशांत राजपूत प्रमाणे स्वतःला संपवण्याचा विचार कारण…, कोर्टात प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनामुळे बाॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. अभिनेत्याच्या निधानंतर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कोर्टात केलेलं वक्तव्य अत्यंत खळबळजनक...

सुशांत राजपूत प्रमाणे स्वतःला संपवण्याचा विचार कारण..., कोर्टात प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 1:10 PM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात स्वतःचे प्राण संपवले. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. आज देखील अभिनेत्याला कोणी विसरु शकलं नाही. सुशांत याने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये अनेकांनी स्वतःला संपवलं. आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील भर कोर्टात एकेकाळी स्वतःला संपवण्याचा विचार केला होता… असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..

बॉलिवूडमध्ये बाहेरुन आलेल्या कलाकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा विचार केला. सुशांतच्या जागी मी स्वतःला पाहात होती… असं देखील अभिनेत्री म्हणाली. असं म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रनौत आहे. कंगना आणि गीतकार जावेद अख्तर यांची कोर्टात केस सुरु आहे.

सुशांतच्या निधनानंतर कंगनाची अवस्था

सुनावणी सुरु असताना कंगना हिने जावेद अख्यर यांच्यावर निशाणा साधला. ‘बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेल्या कलाकारांना वाईट वागणूक दिली जाते. त्यांना विविध मार्गांनी सतत त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असतो. जेव्हा सुशांतने स्वतःला संपवलं तेव्हा मी देखील स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. कारण सुशांतच्या मृत्यूचा वाईट परिणाम माझ्यावर झाला होता.’

हे सुद्धा वाचा

जावेद अख्तर यांना भेटल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती कंगना

2016 मध्ये जेव्हा कंगना आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यात वाद सुरु होते. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी त्यांच्या घरी बोलावलं होतं आणि धमकी देखील दिली होती. अख्तरांना भेटल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये होती असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केल. पण कंगना करत असलेल्या सर्व आरोपामध्ये काहीही तथ्य नाही.

इंडस्ट्री, सुशांतबद्दल कंगनाचं मोठं वक्तव्य

‘मला लोकांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. बाहेरून आलेल्या कलाकारांसाठी बॉलिवूड योग्य नाही. माझ्यावर ज्यांनी निशाणा साधला, त्यांवर मी देखील निशाणा साधेल असा माझा स्वभाव नाही…’ असं देखील कंगना म्हणाली.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या सुशांत याने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. स्वतःला फक्त टीव्ही विश्वापर्यंत मर्यादीत न ठेवता अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 2020 मध्ये अभिनेत्याने स्वतःला संपवलं आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला..

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.