Taapsee Pannu: ‘मी अद्याप गरोदर नाही…’, लग्नाआधी तापसी पन्नू हिने का केलं असं वक्तव्य? कारण समोर

'मी अद्याप गरोदर नाही..', लग्नाआधी तापसी पन्नू हिने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा..., अभिनेत्री का म्हणाली असं? अखेर कारण समोर आलंच... सर्वत्र तापसी हिची चर्चा...

Taapsee Pannu: 'मी अद्याप गरोदर नाही...', लग्नाआधी तापसी पन्नू हिने का केलं असं वक्तव्य? कारण समोर
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 11:01 AM

मुंबई | 18 जुलै 2023 : ‘बेबी’, ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. तापसी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. एवढंच नाही अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. ज्यामुळे तापसीला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला. आता देखील तापसीने असं वक्तव्य केलं, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘मी अद्याप गरोदर नाही..’ असं वक्तव्य लग्नाआधी केल्यामुळे तापसी चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र तापसी पन्नू हिची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे, तापसीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर आहे. मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. चाहत्यांसोबत गप्पा मारत असताना अभिनेत्री सोशल मीडियापासून का दूर आहे.. यामागचं कारण सांगितलं आहे. शिवाय लग्न आणि आई होण्यावर देखील अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे…

सोशल मीडियाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सोशल मीडियावर नकारात्मक वातावरण असल्यामुळे ऑफलाईन राहायला आवडतं…’ असं अभिनेत्री म्हणाली. तापसीने १ जुलै रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर आहे.

हे सुद्धा वाचा

प्रश्न – उत्तरांच्या खेळात अभिनेत्रीला एका चाहत्याने लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी अद्याप गरोदर नाही… जेव्हा लग्न करेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल…’ असं देखील तापसी म्हणाली. अद्याप गरोदर नाही या वक्तव्यामुळे तापसी तुफान चर्चेत आली आहे. तापसी पन्नू बॅडमिंटनपटू प्रशिक्षक मॅथियास बोईसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

तापसी पन्नू हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री, लवकरच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र तापसी हिच्या आगामी सिनेमांची चर्चा रंगत आहे.

बॉलिवूडसोबतच अभिनेत्री तामिळ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. तापसी सध्या ‘एलियन’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सिनेमाबद्दल मोठी अपडेट देखील शेअर केली होती.

सिनेमाचं नाव एलियन आहे, पण अभिनेत्री एलियनच्या भूमिकेत दिसणार नाही. तापसी ‘वो लडकी हैं कहां’, ‘फिर आई हसीन दिलरूबा’ आणि ‘जन गण मन’ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.