‘श्लोका अंबानी कुटुंबात आल्यापासून…’, मोठ्या सूनेबद्दल असं काय म्हणाले मुकेश अंबानी?

Ambani Family | आकाश अंबानी यांची पत्नी आणि कुटुंबातील मोठी मोठी सून श्लोका मेहता यांच्याबद्दल मुकेश अंबानी म्हणाले, 'श्लोका अंबानी कुटुंबात आल्यापासून...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी यांच्या कुटुंबाची चर्चा...

'श्लोका अंबानी कुटुंबात आल्यापासून...', मोठ्या सूनेबद्दल असं काय म्हणाले मुकेश अंबानी?
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 8:10 AM

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील मुकेश अंबानी यांची चर्चा सर्वत्र रंगत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सून श्लोका अंबानी यांचं कौतुक केलं आहे. श्लोका अंबानी कुटुंबात आल्या… हे मी स्वतःचं भाग्य समजतो, असं वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केलं आहे. रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी सूनेचं कौतुक केलं.

कार्यक्रमात श्लोका मेहता यांचे वडील रसेल मेहता देखील उपस्थित होते. रसेल मेहता यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रसेल मेहता यांची लेक श्लोका मेहता यांचं लग्न अंबानी कुटुंबातील मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्यासोबत झालं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फत्त अंबानी कुटुंबाची चर्चा रंगली आहे..

सून श्लोका मेहता यांच्याबद्दल काय म्हणाले मुकेश अंबानी?

मुकेश अंबानी म्हणाले, ‘अंबानी कुटुंबाची मुळे काठियावाडमध्ये आहेत.’ पालनपूरच्या जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे संकेतही अंबानी यांनी दिले. ‘काठियावाडी आणि पालनपूर यांच्यातील भागीदारी ही संधी अधिक मोठी करू शकते. सून श्लोका मेहता या प्रदेशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Rosy Blue चे प्रमुख रसेल मेहता यांची मुलगी आहे. अंबानी कुटुंबात श्लोका आल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.’ असं देखील मुकेश अंबानी म्हणाले..

श्लोका मेहता – आकाश अंबानी

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर श्लोका मेहता – आकाश अंबानी यांनी लग्नाचा निर्णय घेतला. शाळेत देखील दोघे एकत्र होते. लग्नानंतर श्लोका – आकाश एक मुलगा आणि एका मुलीचे आई – बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. चाहते देखील त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ लाईक्स, कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्रि-वेडिंग सेलिब्रेशन दरम्यान देखील श्लोका – आकाश तुफान चर्चेत होते. तेव्हा देखील दोघांच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. अंबानी कुटुंबातील लहान मुलाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली. जामनगर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात फक्त सेलेब्रिटी नाहीतर, जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.