मला कोणत्या पुरुषाची गरज… नोरा फतेही हिच्या सडेतोड वक्तव्याची चर्चा, महिलांची बाजू मांडत म्हणाली…

Nora Fatehi | 'महिलांनी पालन पोषनाची भूमिका... महिलांना एका मर्यादेपर्यंत...', नोरा फतेही हिच्या वक्तव्याची चर्चा... स्त्रीवाद यावर असं काय म्हणाली दिलबर गर्ल? नोरा कायम असते कोणत्या न कोणत्या कारणीमुळे चर्चेत... अभिनेत्रीने आता केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा...

मला कोणत्या पुरुषाची गरज... नोरा फतेही हिच्या सडेतोड वक्तव्याची चर्चा, महिलांची बाजू मांडत म्हणाली...
नोरा फतेही मोरोक्कन पार्श्वभूमीतून आली आहे, तिचे पालक दोघेही मोरोक्कन आहेत. मात्र, त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. यामुळे त्यांना भारतीय निवडणुकीत मतदान करण्याची कायदेशीर पात्रता नाही.
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 8:22 AM

अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या बोल्ड लूक आणि डान्समुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या लूक आणि डान्समुळे नाहीतर, सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री महिला, महिलांचं स्वतंत्र्य आणि स्त्रीवाद यावर मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नोरा फतेही म्हणाली, ‘मला कोणत्या पुरुषाची गरज नाही आणि स्त्रीवाद सारख्या गोष्टीवर मला विश्वास नाही. महिलांना कामावर जायला हवं. महिलांना स्वतःचं आयुष्य आहे… महिलांनी स्वतंत्र व्हायला हवं पण एका मर्यादेपर्यंत…’फेमिनिज्म’ सारख्या गोष्टींची गरज नाही. माझा या मूर्खपणावर विश्वास नाही. मला वाटतं, स्त्रीवादाने आपला समाज उद्ध्वस्त केला आहे.

‘मला वाटतं महिला पालन – पोषण करणाऱ्या असतात… पण त्यांना कामाला जायला हवं आणि स्वतःचं आयुष्य जगायला हवं… महिलांना एक आई, पत्नी आणि पालन – पोषणाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असायला हवं… जसे पुरूषाने पुरवठादार, पैसे कमावणारा, पिता आणि पती अशी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

हे सुद्धा वाचा

लोकं याला जुने आणि पारंपरिक विचार समजतात, पण अभिनेत्रीनुसार, हे विचार नॉर्मल आहेत…काही पुरुषांना घरातल्या कर्त्या पुरुषांची भूमिका बजावायची नसते… फेमिनिज्मच्या विश्वात पुरुषांचं ब्रेनवॉश केलं जात आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नोरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘साकी साकी’, ‘दिलबर दिलबर’, ‘पछताओगे’ आणि ‘डांस मेरी रानी’ गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्याचं मनोरंजन केलं. नोराच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील नोरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील नोरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, नोरा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या रिलेशिनशिपच्या देखील चर्चा रंगल्या. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.