तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते…; ‘महाभारत’मधील कृष्णाच्या मुली असं का म्हणाल्या?

‘महाभारत’मधील कृष्णा म्हणजे अभिनेते नितीश भारद्वाज गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर आणि पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण आता त्यांच्या मुली देखील नितीश भारद्वाज यांचा विरोध करत आहेत.

तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते...; ‘महाभारत’मधील कृष्णाच्या मुली असं का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 12:22 PM

मुंबई | 9 मार्च 2024 : 1988 साली प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिका सर्वांना माहिती आहे. मालिकेची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. मालिकेत अभिनेते नितीश भारद्वाज यांनी श्री कृष्ण यांची भूमिका साकराली होती. पण आता नितीश भारद्वाज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नितीश भारद्वाज त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. नितीश भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पत्नीने मानसिक छळ केला, एवढंच नाहीतर मुलींना देखील माझ्यापासून लांब केलं… आसा आरोप नितीश भारद्वाज यांनी केला.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत नितीश भारद्वाज यांना पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नितीश भारद्वाज म्हणाले, ‘वैवाहिक आयुष्यात मी अनेक संकटांचा सामना केला आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे माझ्या मुली देखील माझ्यापासून दूर झाल्या आहेत.

‘माझ्या 11 वर्षांच्या मुलींनी माझ्यासाठी जे शब्द वापरले आहेत, ते मी तुम्हाला याठिकाणी सांगतो… त्या मला म्हणाल्या, बाबा आम्हाला तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते. एवढं सगळ केल्यानंतर देखील मुली असं बोलत आहेत? आई – वडील विभक्त झाल्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुली असं बोलत आहेत…’

हे सुद्धा वाचा

पुढे नितीश भारद्वाज म्हणाले, ‘मला असं वाटतं माझी फसवणूक करण्यात आली आहे. ही माझ्या मुलींची लढाई आहे. जी मी आता लढत आहे. त्यामुळे मला नाही माहिती मी अन्य कोणत्या महिलेसोबत न्याय करु शकतो की नाही… मझ्यासाठी लग्न फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी नात्यांवर विश्वास ठेवतो. मी माझ्या आई-वडिलांसोबत अनेक लग्न यशस्वी होताना पाहिले आहेत…’

नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी 2009 मध्ये लग्न केलं. नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी जुळ्या मुली आहेत. स्मिता गटे यांच्यासोबत नितीश भारद्वाज यांचं दुसरं लग्न आहे नितीश भारद्वाज यांचे पहिलं लग्न मोनिका पाटील यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नितीश भारद्वाज आणि मोनिका यांचा घटस्फोट 2005 मध्ये झाला. नितीश भारद्वाज सध्या दुसऱ्या घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.